Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जुनी पेन्शनसाठी एक सप्टेंबरपासून शिक्षकांचे काळ्या फिती लावून आंदोलनभरत जाधव यांची महाराष्ट्र चेंबरच्या कार्यकारिणीवर निवड शिक्षकांचा एकच निर्धार, कौस्तुभ गावडेंना आमदार करुन विधानपरिषदेत पाठविणारराज्यभरातील व्यापार -व्यावसायिकांच्या प्रतिनिधींची पणनमंत्र्यांच्यासोबत चर्चा ! बाजार समिती पदाधिकारी व्यापाऱ्यांची लवकरच संयुक्त बैठक!!वीज कामगारांचे हाल करण्यासाठी मेस्माची चाल सरकारने वापरली का? कामगार संघटनेचा सवालसांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान जयसिंगपुरात लोकनृत्य महोत्सवबाजार समिती पदाधिकारी निवडी शुक्रवारी ! सभापतिपदी शेखर देसाई की मेघा राजेंद्र देसाई ! !करवीर-हातकणंगले शिक्षक पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद : आमदार अमल महाडिकआश्वासन नको – आता ठोस निर्णय हवा, भारतीय मजदूर संघातर्फे आंदोलनउचगावच्या सर्वागिण विकासासाठी  एक कोटी रुपयांचा निधी देणार - खासदार धनंजय महाडिक

जाहिरात

 

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान जयसिंगपुरात लोकनृत्य महोत्सव

schedule26 Aug 26 person by visibility 100 categoryसामाजिक

महाराष्ट्र  न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा, लोककला आणि लोकसंस्कृतीचा सांस्कृतिक वारसा जतन व संवर्धित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘लोकनृत्य महोत्सव’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव शनिवार, २९ ऑगस्ट ते  ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत डॉ. एस. एस. भिर्डी रंगमंदिर, जयसिंगपूर येथे दररोज सायंकाळी ६.३० ते ९.३० वाजेपर्यंत आयोजित केला आहे.

या तीन दिवसांत तारपा, बोहाडा, सोंगी मुखवटे, मोरघा, लावणी, पालखी, बाल्या, दिवली, दिंडी, कोळी, शेतकरी, वाघ्या-मुरली, जागरण-गोंधळ, जोगवा, लेझीम, धनगरी (कैपत), पोतराज, मंगळागौर, बंजारा, गौर नाच, गज धनगरी आणि भिल्ल आदिवासी या विविध लोककला व लोकनृत्य प्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार असून, या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा, सांस्कृतिक वैविध्य आणि लोकजीवनाचे  दर्शन रसिकांना घडणार आहे.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने राज्यातील लोककला व लोकपरंपरांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

‘लोकनृत्य महोत्सवा’चा प्रवेश विनामूल्य आहे. रसिकांनी या सांस्कृतिक महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा अनुभवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक  प्रशांत संगीता कैलास खेडेकर यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes