Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बाजार समिती पदाधिकारी निवडी शुक्रवारी ! सभापतिपदी शेखर देसाई की मेघा राजेंद्र देसाई ! !करवीर-हातकणंगले शिक्षक पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद : आमदार अमल महाडिकआश्वासन नको – आता ठोस निर्णय हवा, भारतीय मजदूर संघातर्फे आंदोलनउचगावच्या सर्वागिण विकासासाठी  एक कोटी रुपयांचा निधी देणार - खासदार धनंजय महाडिकबेकायदेशीर गर्भलिंग चाचणी - गर्भपात करणाऱ्या एसपी गॅंगच्या 11 जणांवर मोक्का, राज्यातील पहिलीच कारवाईएसएनडीटी विभागीय युवा महोत्सव गाजविला शहीद वीरपत्नीच्या विद्यार्थिनींनी ! सोळा पदकांची कमाई !!शिवाजी विद्यापीठाचा सतीश काळसेकर पुरस्कार प्रभा गणोरकर, रवी कोरडे यांना जाहीरबिनविरोधच्या चर्चेत तथ्य नाही, गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार-  आमदार सतेज पाटीलउद्योग क्षेत्रातील नवीन संधीविषयी कोल्हापुरात दोन दिवसीय विशेष कार्यक्रमकिकवी खरेदी व्यवहाराची स्वतंत्रपणे ईडीमार्फत  चौकशी करा - राजवर्धन नाईक निंबाळकर

जाहिरात

 

बाजार समिती पदाधिकारी निवडी शुक्रवारी ! सभापतिपदी शेखर देसाई की मेघा राजेंद्र देसाई ! !

schedule26 Aug 26 person by visibility 37 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदाच्या निवडी शुक्रवारी, २८ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे. विद्यमान सभापती नानासो कांबळे यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला आहे. तर उपसभापती राजाराम चव्हाण यांचे निधन झाले आहे. यामुळे सभापती व उपसभापतिपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सहकारी संस्था कार्यालयातील सहायक निबंधक प्रेमदास राठोड यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी चार वाजता बाजार समिती सभागृहात या निवडी होणार आहेत.  विद्यमान सभापती कांबळे यांनी ११ ऑगस्ट रोजी सभापतिपदाचाा राजीनामा दिला आहे. बाजार समितीत सर्वपक्षीय सत्ता आहे.  सभापतिपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. माजी आमदार के. पी. पाटील यांच्या कोटयातून सभापतिपदाची कोणाची निवड होणार याकडे लक्ष आहे. सभापतिपदासाठी  संचालक प्रा. शेखर देसाई, संचालिका मेघा राजेंद्र देसाई यांची नावे चर्चेत आहेत. तर उपसभापतिपदासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून निवडून आलेले संचालक पांडूरंग काशीद व शिवसेनेचे संचालक संदीप वराडेकर यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. बाजार समितीत सतेत सारे पक्ष एकत्र असले तरी संचालक मंडळात राजकारण आहे. गेल्या काही महिन्यापासून संचालक मंडळातील धुसफूस वाढली आहे. संचालक मंडळातील काही जण कुरघोडीचे राजकारण आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes