भोई समाजातर्फे रक्षाबंधनानिमित्त गरीब महिलांना रविवारी साड्या वाटपाचा कार्यक्रम
schedule20 Aug 26 person by visibility 91 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था कोल्हापूर शाखेच्यावतीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून रविवारी 23 ऑगस्ट 2026 रोजी समाजातील गरीब महिलांना साड्या वाटप करण्यात येणार आहे. खासदार शाहू महाराज व उद्योगपती परशुराम तावरे यांच्या हस्ते आणि संस्थेचे महासचिव गजानन साटोटे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. एकनाथ काटकर व कार्याध्यक्ष विजयराव भोई यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. शहाजी छत्रपती कॉलेज परिसरातील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास शाहू शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे, भोई समाज संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष हिम्मतराव मोरे, महिला आघाडी अध्यक्ष सविता डाहे, मराठवाडा महिला अध्यक्ष अनिता लाडे, संस्थेचे राष्ट्रीय समन्वयक नानासाहेब लकारे, युवा अध्यक्ष चंद्रकांत लाडे, विदर्भ महिला अध्यक्ष अलका पसारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी माहिती प्रा. काटकर यांनी दिली. पत्रकार परिषदेला संघटनेचे जिल्हाध्यक्ष पिंटू भोई, शहराध्यक्ष किशोर आयरे, विभागीय सचिव उत्तम नलवडे, आनंदराव भोई, रामभाऊ गुजर, दिलीप आयरे, हनुमंतराव आपटे, मधुकर करंजे, अनिल भोई, हर्षदा पोवार आदी उपस्थित होते.