Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारीपदी मोसमी चौगुलेएमपीएससी पेपरफुटीविरोधात कोल्हापुरात तरुणाई रस्त्यावरब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्या अध्यक्षपदी विवेक शुक्ल, उपाध्यक्षपदी नंदकुमार मराठेताराराणी विद्यापीठात ‘आदर्श शिक्षक - गुणवंत सेवक’ पुरस्कारांचे उत्साहात वितरणजिल्हा परिषदेच्या प्रांगणात बुधवारी रानभाजी महोत्सवप्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांना डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार प्रदानशाळा वाचवा-  शिक्षण वाचवासाठी पाच ऑक्टोबरला मुंबईत धरणे आंदोलनकोल्हापुरात तीन दिवसीय “ग्लोरियस"  वैद्यकीय परिषदजिप कर्मचारी सहकारी सोसायटीतर्फे सभासदांच्या पाल्यासाठी अभ्यासिकाकोरे अभियांत्रिकीत ‘मल्टी-बिझनेस मॉडेल इनोव्हेशन’वर मार्गदर्शन

जाहिरात

 

ताराराणी विद्यापीठात ‘आदर्श शिक्षक - गुणवंत सेवक’ पुरस्कारांचे उत्साहात वितरण

schedule07 Sep 26 person by visibility 79 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ताराराणी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित ‘ताराराणी आदर्श शिक्षक पुरस्कार व गुणवंत सेवक पुरस्कार प्रदान समारंभ’ उत्साहात झाला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श शिक्षकांसह संस्थेच्या कार्यात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या गुणवंत सेवकांचा यावेळी गौरव करण्यात आला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे प्रमुख पाहुणे  होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील होते. यावेळी व्यासपीठावर ताराराणी विद्यापीठ संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. एस. एन. पवार, उपाध्यक्ष ॲड. प्रकाश हिलगे, उपाध्यक्ष  अशोक पर्वते व सचिव प्राजक्त पाटील उपस्थित होते. 

‘ताराराणी आदर्श शिक्षक पुरस्कार’ हा कमला कॉलेज मधील मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुजय बाबुराव पाटील यांना तर ‘गुणवंत सेवक पुरस्कार’ ताराराणी विद्यापीठ संस्थेचे कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र विठ्ठल इंगवले यांना प्रदान करण्यात आला.  शाल, श्रीफळ, बुके, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, १०,००० रुपयांचा धनादेश आणि गुणवंत सेवक पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या सेवकांना शाल, श्रीफळ, बुके, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह तसेच ५००० रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. 

  आबिटकर यांनी आपल्या भाषणात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण संस्थांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. “शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान देत नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची, विचारांची आणि मूल्यांची जडणघडण करतो. त्यामुळे राष्ट्राच्या भवितव्याची निर्मिती करण्याचे मोठे कार्य शिक्षकांच्या हातात आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले. ताराराणी विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करताना आबिटकर यांनी संस्थेने शिक्षण क्षेत्रात सातत्याने दिलेल्या योगदानाचे कौतुक केले.

प मान्यवरांच्या हस्ते ‘कै. व्ही. टी. पाटील’ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेतला. उषाराजे हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ‘ताराराणी गौरव गीत’ सादर केले.पी. आर. मंडलिक यांनी स्वागत केले. एस. डी. चव्हाण यांनी आभार मानले. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes