Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारीपदी मोसमी चौगुलेएमपीएससी पेपरफुटीविरोधात कोल्हापुरात तरुणाई रस्त्यावरब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्या अध्यक्षपदी विवेक शुक्ल, उपाध्यक्षपदी नंदकुमार मराठेताराराणी विद्यापीठात ‘आदर्श शिक्षक - गुणवंत सेवक’ पुरस्कारांचे उत्साहात वितरणजिल्हा परिषदेच्या प्रांगणात बुधवारी रानभाजी महोत्सवप्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांना डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार प्रदानशाळा वाचवा-  शिक्षण वाचवासाठी पाच ऑक्टोबरला मुंबईत धरणे आंदोलनकोल्हापुरात तीन दिवसीय “ग्लोरियस"  वैद्यकीय परिषदजिप कर्मचारी सहकारी सोसायटीतर्फे सभासदांच्या पाल्यासाठी अभ्यासिकाकोरे अभियांत्रिकीत ‘मल्टी-बिझनेस मॉडेल इनोव्हेशन’वर मार्गदर्शन

जाहिरात

 

कोरे अभियांत्रिकीत ‘मल्टी-बिझनेस मॉडेल इनोव्हेशन’वर मार्गदर्शन

schedule07 Sep 26 person by visibility 62 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, वारणानगर येथेवारणा ग्लोबल लीडर्स कनेक्टउपक्रमांतर्गत कोपनहेगन बिझनेस स्कूल, डेन्मार्कचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ प्रो. पीटर लिंडग्रेन यांचेमल्टी-बिझनेस मॉडेल इनोव्हेशन अँड ग्लोबल अपॉर्च्युनिटीजया विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे आयोजन एमसीए एमबीए विभागाने केले.

बदलत्या व्यावसायिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात व्यवसाय मॉडेलमधील नवकल्पना, तंत्रज्ञान, उद्योजकता, सहकार्य आणि जागतिक संधींचे महत्त्व यावेळी प्रो. लिंडग्रेन यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. पारंपरिक व्यवसाय पद्धतींच्या पलीकडे विचार करून नव्या संधींचा शोध घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केलीया सत्रात विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या उपक्रमासाठी वारणा विविध उद्योग शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के तसेच श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी यांचे मार्गदर्शन लाभले.

. एमसीए विभागप्रमुख डॉ. शिवलीला अरळीमट्टी आणि एमबीए विभागप्रमुख पूनम कडापूरे यांनी नियोजन केले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून सायबर सिक्युरिटी विभागप्रमुख प्रा. राजेश गाडे यांनी काम पाहिले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. आय. पाटील, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे उपस्थित होते. प्रा. सुभाष कोळी यांनी आभार व्यक्त केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes