प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांना डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार प्रदान
schedule07 Sep 26 person by visibility 77 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : सांगरूळ शिक्षण संस्थेच्या स. ब. खाडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांना राज्य सरकारचा डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मान चिह्न, प्रमाणपत्र, शाॅल व 25 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप होते. शिक्षक दिनाचे औचित्य साधून उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने पुणे विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृहात पुरस्कार वितरण समारोह शनिवारी उत्साहात पार पडला. डॉ. कुंभार यांना उच्च शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानासाठी प्राचार्य गटातून २०२६ चा पुरस्कार जाहीर झाला होता. डॉ. कुंभार यांना सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष य. ल. खाडे, सचिव आमदार प्रा. जयंत आसगावकर, उपाध्यक्ष के. ना. जाधव, सहसचिव डी. एन. कुलकर्णी, खजाननीस डी. जी. खाडे यांनी अभिनंदन केले.