कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसाबद्दल सामाजिक उपक्रम
schedule12 Jun 26 person by visibility 48 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करवीर तालुक्यातील शिये येथील भाजपा पदाधिकाऱ्यांच्यावतीने दिव्यांगांसाठी ६ व्हिलचेअर आणि ६ स्टीक देण्यात आल्या. यावेळी संजय गांधी निराधार योजना सदस्य मारुती बुवा, करवीर पंचायत समिती सदस्य जयसिंग काशीद, दत्तात्रय चौगुले, अनिल जाधव, बाजीराव सातपुते, अमोल उरुणकर, शिवाजी पाटील, संगीता खाडे, पुष्पा पवार, अर्पिता जाधव उपस्थित होते. तर कोल्हापुरातील किरण शिराळे फौंडेशन आणि श्रीराम युवा प्रतिष्ठानच्यावतीने पांजरपोळ संस्थेतील मुक्या जनावरांना खाद्य देवून वाढदिवस साजरा करण्यात आला. कोल्हापूर युवा मोर्चा महानगरतर्फे पांजरपोळ येथील जनावरांसठी चारा देण्यात आला.