पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पद भरतीस मुदतवाढ मिळावी - भरत रसाळे
schedule12 Jun 26 person by visibility 48 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन :खाजगी शाळांतील रिक्त शिक्षक पदे पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे भरण्यास मुदतवाढ द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी शिक्षण सचिव रणजीतसिंह देओल व शिक्षण आयुक्त एस . पी . सिंग यांच्याकडे केली आहे .
राज्यातील शिक्षक पदभरतीची कार्यवाही "पवित्र पोर्टल प्रणाली "मार्फत करण्यात येते. त्यानुसार 2025 -26 ची संचमान्यता विचारात घेऊन मंजूर पदे, कार्यरत पदे व रिक्त पदे या बाबी निश्चित करण्यात येतात त्यानंतर बिंदू नामावली प्रमाणे रोस्टर तपासणी करून रिक्त पदाच्या जाहिराती पवित्र पोर्टल प्रणालीवर अपलोड केल्या जातात . ही प्रक्रिया पूर्ण करण्यसाठी सध्या 15 जून 2026 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. ती वाढविली पाहिजे कारण अजूनही राज्यातील अनेक खाजगी प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2025-26 ची संच मान्यता अपूर्ण आहे त्यामुळे शाळांच्या रोस्टर तपासणीचे काम झाले झालेले नाही .यामुळे अनेक शाळांना पवित्र पोर्टल प्रणालीमध्ये रिक्त पदाची जाहिरात अपलोड करणे अडचणीचे होत आहे .
त्यामुळे पद भरतीची जाहिरांत अपलोड करण्यासाठी 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ द्यावी .व दरम्यानच्या काळात शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना संच मान्यता व रोस्टर तपासणीचे काम तात्काळ पूर्ण करण्यासाठी आदेश करावेत अशी मागणी केली आहे.