Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कृष्णराज महाडिकांना चंद्रकांत पाटलांच्या शुभेच्छा !  सामाजिक उपक्रमांची जोड अन् कार्यकर्त्यांचा उत्साह  !!कोल्हापुरात तेरा जूनपासून एक दिवस आड पाणी पुरवठाकोजिमाशि पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र पाटील, व्हाइस चेअरमनपदी प्रकाश कोकाटेशाळा प्रवेशोत्सव ठरणार प्रेरणादायी ! मंत्री - खासदार- आमदार - अधिकारी करणार विद्यार्थ्यांचे स्वागत !!कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसाबद्दल सामाजिक उपक्रमपवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पद भरतीस मुदतवाढ मिळावी - भरत रसाळेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोकुळ दूध संघाचे ठराव शक्ती प्रदर्शनाने देणार - मंत्री हसन मुश्रीफ       अमित शहांची होणार कोल्हापुरात जाहीर सभा ! दोन दिवसीय दौऱ्यात भरगच्च कार्यक्रम!!गोकुळचे एमडी योगेश गोडबोले यांच्यावर मोठी जबाबदारी, राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधीज्यांच्यासाठी बाग, त्यांच्याच हस्ते उद्घाटन;  लोकार्पणाचा मान चिमुकल्यांना

जाहिरात

 

कोजिमाशि पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र पाटील, व्हाइस चेअरमनपदी प्रकाश कोकाटे

schedule12 Jun 26 person by visibility 17 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र मारुती पाटील (भाई माधवरावजी बागल  हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज) तर व्हाइस चेअरमनपदी प्रकाश  रामचंद्र कोकाटे (माध्यमिक  विद्यालत शित्तूर तर्फ मलकापूर) यांची निवड झाली.निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय इंगवले यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या हस्ते नूतन चेअरमन पाटील व व्हाईस चेअरमन कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकेक अर्ज दाखल झाल्याने या निवडी बिनविरोध करण्यात आल्या. चेअरमनपदासाठी पाटील यांचे नाव संचालक मनोहर पाटील यांनी सुचविले. संचालक अनिल चव्हाण यांनी अनुमोदन दिले. व्हाइस चेअरमनपदासाठी कोकाटे यांचे नाव संचालिका शीतल हिरमेठ यांनी सुचविले. संचालक श्रीकांत कदम यांनी अनुमोदन दिले. पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कुरडे यांनी निवड प्रक्रियेचे वाचन केले. यावेळी संचालक अविनाश चौगले, बाळ डेळेकर, दत्तात्रय घुगरे, दीपक पाटील, सचिन शिंदे, राजाराम शिंदे, राजेंद्र रानमाळे, मदन निकम, उत्तम पाटील, शरद तावदारे, पांडूरंग हळदकर, श्रीकांत पाटील, सुभाष खामकर, जितेंद्र म्हैशाळे, ऋतुजा पाटील, पांडूरंग पाटील, उपमुख्यक कार्यकारी अधिकारी उत्तम कवडे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes