राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोकुळ दूध संघाचे ठराव शक्ती प्रदर्शनाने देणार - मंत्री हसन मुश्रीफ
schedule12 Jun 26 person by visibility 114 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन :राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोकुळ दूध संघाचे ठराव एकत्रितपणे गोळा करून शक्ती प्रदर्शनाने जमा करणार आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. सहायक निबंधक- दूग्ध यांच्याकडे ठराव सुपूर्द करण्याच्या या कार्यक्रमाला मी स्वतः उपस्थित राहणार आहे, असेही ते म्हणाले.
मंत्री मुश्रीफ हे भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात एका बैठकीसाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते. मुश्रीफ पुढे म्हणाले, सहायक निबंधक हे ठराव जर एक- एक अशा पद्धतीने घेणार असतील तर आम्ही सर्वच ठरावधारक एकत्र मिळून जाणार आहोत. ठरावधारक संस्था प्रतिनिधी आधार कार्ड घेऊन आत जातील. त्यांच्या- त्यांच्या संबंधित तालुक्याच्या ठिकाणी त्या ठरावाची नोंद होईल. ठराव सुपूर्द करून ते पोहच घेतील.गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत विचारले असता मुश्रीफ म्हणाले, ही निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत, महायुतीच जिंकणार आहे आणि चेअरमनही महायुतीचाच होणार आहे.
ठराव देण्याची तारीख....
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर म्हणाले, गोकुळ दूध संघाचे ठराव सहायक निबंधक- दुग्ध यांच्याकडे जमा करण्याची तारीख लवकरच कळविली जाईल. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही संस्थेने परस्पर ठराव देऊ नयेत.
==========