Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
फौन्ड्री उद्योगासह कोल्हापूरच्या हद्दवाढीसंबंधी दिल्लीत केंद्र स्तरावर पाठपुरावा करणार – खासदार प्रवीण खंडेलवालगोकुळकडून म्हैस - गाय दूध खरेदी दरात वाढराखीव कर्मचारी निवडणूक भत्ता : लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित शाश्वत विकास म्हणजे सर्वांगीण विकास होय  : डॉ. यशवंत थोरातअहिंसा-सत्य -अस्तेय ही मूल्ये आजच्या समाजाची अपरिहार्य गरज — डॉ. सुषमा रोटेउदंड होणार नगरसेवक, नावापुढे पद -शहरासाठी योगदानाचे काय ? स्वीकृतच्या पदाचीही खांडोळी ! !कास्ट्राईब कर्मचारी कल्याण संघटनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरीडीवाय पाटील हॉस्पिटल, अभियांत्रिकी प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे विजेतेराजर्षी शाहू जन्मस्थळ संग्रहालयाचा शनिवारी लोकार्पण सोहळावाढदिवसाला विधायक उपक्रमांची जोड, सुरेंद्र जैन यांचा आदर्शवत पायंडा

जाहिरात

 

शाश्वत विकास म्हणजे सर्वांगीण विकास होय  : डॉ. यशवंत थोरात

schedule20 Feb 26 person by visibility 37 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: ‘ आर्थिक विकास हा फक्त अर्थव्यवस्थेशी संबंधित असतो तर शाश्वत विकास हा अर्थव्यवस्था, समाज आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित असल्यामुळे तो सर्वांगीण विकास आहे.’ असे प्रतिपादन नाबार्डचे माजी चेअरमन डॉ.यशवंत थोरात यांनी केले.

 देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विभाग आणि विधी विभागाच्यावतीने आयोजित "सस्टेनेबल डेव्हलपमेंट इन इंडिया :बॅलन्सिंग इकॉनॉमी सोसायटी अँड एन्व्हायरमेंट" या विषयावर राष्ट्रीय परिसंवादात बीजभाषक म्हणून ऑनलाईन बोलत होते.

दिल्ली विधी विद्यापीठाचे प्रा. डॉ. अजय सोनवणे यांनी भारतीय राज्यघटनेतील कलम २१ हे शाश्वत विकासाशी संबंधित आहे.वसुधैव कुटुंबकम ही भारतीय संस्कृती आहे त्यामुळे पर्यावरण हे शोषणासाठी नसून संवर्धनासाठी असल्याचे सांगितले. डॉ व्ही. बी. जुगळे म्हणाले, ‘कोणतही देश हा नैसर्गिक भांडवलाचा वापर करून विकासाकडे जात असतो. दारिद्र्य असेल तर विकासाकडे जाता येते परंतु विपुलता असेल या विपुलतेतून विपुलतिकडे जाण्याचा मार्ग हा खडतर असतो हा खडतर मार्ग सोपा करण्याचा एक उपाय म्हणजे शाश्वत विकास होय. ’शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ .एम एस देशमुख म्हणाले की भारताची अर्थव्यवस्था ही पाच ट्रिलियन डॉलर इतकी होणार आहे. आणि हे ध्येय गाठण्यासाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग देशांमध्ये वाढीला लागणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. या राष्ट्रीय परिसंवादासाठी कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा  रजनी मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ विश्वनाथ मगदूम,सदस्य ॲड.वैभव पेडणेकर,ॲड. अमित बाडकर यांचे मार्गदर्शन लाभले.

समारोप समारंभ नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स चे प्राचार्य डॉ उत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ वर्षा मैंदर्गी यानी केले उपप्राचार्य डॉ आर. एस. नाईक यांनी आभार मानले. प्रा. डॉ. एस एस देसाई, डॉ.एन.एच.जाधव आणि प्रा. के.डी दिंडे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. याप्रसंगी प्रा.पी.एन.देवळी, डॉ एस. एफ बोथीकर यांनी मांडले, प्रा.डॉ.आर. जे. बिरजे आणि डॉ. सुरेखा सांगरुळकर, प्रा.के.जी. कांबळे, प्रा .डॉ. .एस. बन्ने,डॉ.एस.बी.राजमाने, डॉ एस.एस. गवई,डॉ.सुप्रिया चौगले,ग्रंथपाल टी.एल.कांबळे, प्रा के सी.जोशी,प्रा. सोरटे तासगाव महाविद्यालयाचे डॉ.गावडे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes