Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
फौन्ड्री उद्योगासह कोल्हापूरच्या हद्दवाढीसंबंधी दिल्लीत केंद्र स्तरावर पाठपुरावा करणार – खासदार प्रवीण खंडेलवालगोकुळकडून म्हैस - गाय दूध खरेदी दरात वाढराखीव कर्मचारी निवडणूक भत्ता : लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित शाश्वत विकास म्हणजे सर्वांगीण विकास होय  : डॉ. यशवंत थोरातअहिंसा-सत्य -अस्तेय ही मूल्ये आजच्या समाजाची अपरिहार्य गरज — डॉ. सुषमा रोटेउदंड होणार नगरसेवक, नावापुढे पद -शहरासाठी योगदानाचे काय ? स्वीकृतच्या पदाचीही खांडोळी ! !कास्ट्राईब कर्मचारी कल्याण संघटनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरीडीवाय पाटील हॉस्पिटल, अभियांत्रिकी प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे विजेतेराजर्षी शाहू जन्मस्थळ संग्रहालयाचा शनिवारी लोकार्पण सोहळावाढदिवसाला विधायक उपक्रमांची जोड, सुरेंद्र जैन यांचा आदर्शवत पायंडा

जाहिरात

 

राखीव कर्मचारी निवडणूक भत्ता : लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित 

schedule20 Feb 26 person by visibility 131 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राखीव कर्मचाऱ्यांचा भत्ता तात्काळ देण्याचे लेखी आश्वासनानंतर कोल्हापूर महानगरपालिकेसमोर होणारे शंखध्वनी आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे माहिती महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांनी दिली.
       कोल्हापूर महानगरपालिकेची महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन महिना झाला. भत्ता न मिळालेल्या कर्मचाऱ्यांसह खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्यावतीने महानगरपालिकेसमोर  शंखध्वनी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. महानगरपालिकेचे उपायुक्त किरणकुमार धनवाडे यांनी भत्ता तात्काळ देण्या संदर्भात संघटनेस  लेखी आश्वासन दिल्यानंतर आजचे आंदोलन स्थगित करण्यात आले.
     निवडणूक कर्तव्यावर असलेल्या एकूण कर्मचाऱ्यांच्यासह पाच टक्के कर्मचाऱ्यांची, प्रत्यक्ष निवडणूक केंद्रावर , मतमोजणी, पोष्टल मतदान,  आशा सेविका यांची राखीव कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात येते. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या सर्वांना देय असलेला भत्ता तात्काळ देणे आवश्यक आहे. पण सदरचा भत्ता सदर कर्मचाऱ्यांना दिला गेला नाही.
    कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी डी.सी.कुंभार यांच्या हस्ते लेखी आश्वासनाचे पत्र संघटनेस दिले. यावेळी खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्यसचिव राजेंद्र कोरे, जिल्हाध्यक्ष टी.आर.पाटील,राज्य सल्लागार एम.डी.पाटील, विभागीय शिक्षकेतर प्रमुख राजेंद्र पांढरबळे,जिल्हा शिक्षकेतर प्रमुख सागर जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष धीरज पारधी,महिला कार्याध्यक्ष सीमा चोपडे, शहर सहसचिव रवींद्र नाईक, रियाज शिकलगार, अरविंद चव्हाण, गौतम कांबळे, धनंजय शिंदे, कुसुम पांढरबळे, संदिप डवंग उपस्थित होते.

........
 " गेले महिनाभर सातत्यपूर्ण पाठपुरावा करून निवडणूक भत्ता मिळालेला नाही. येत्या आठ दिवसात भत्ता मिळण्याची योग्य कारवाई न झाल्यास महापालिकेसमोर हलगी बजाव आंदोलन करणार... "
टी. आर. पाटील, जिल्हाध्यक्ष,खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes