प्राचार्य डॉ. धनाजी कणसे यांना आदर्श राज्य प्राचार्य पुरस्कार
schedule07 Sep 26 person by visibility 87 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगलीचे प्राचार्य डॉ. धनाजी जी. कणसे यांना राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे देण्यात येणारा ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य प्राचार्य पुरस्कार’, तर सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. जी. व्ही. माळी यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
शनिवारी ५ सप्टेंबर २०२६ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्राचार्य कणसे आणि प्रा. माळी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यस्तरीय निवड समितीने सन २०२४-२५ चे ११ आणि सन २०२५-२६ चे १८, असे एकूण २९ पुरस्कार जाहीर केले आहेत. या पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र असे आहे. प्राचार्य कणसे आणि प्रा.माळी यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल भारती विद्यापीठाचे पदाधिकारी, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.