एमपीएससी एग्रीकल्चरलमध्ये पल्लवी पाटील राज्यात आठवी
schedule13 Feb 26 person by visibility 50 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण अभ्यास आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोल्हापूर येथील नागोजीराव पाटणकर हायस्कूलचे निवृत्त शिक्षक एस. ए. पाटील यांची कन्या पल्लवी पाटील हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी राज्यसेवा परीक्षेत राज्यात आठवा क्रमांक पटकावला. या यशामुळे तिची राज्य शासनाच्या कृषी उपसंचालक या पदावर नुकतीच निवड झाली आहे आणि विशेष म्हणजे तिने हे यश पहिल्याच प्रयत्नामध्ये पूर्ण केला आहे
तिचे प्राथमिक शिक्षण राजर्षी छत्रपती शाहू विद्यालय न्यू पॅलेस येथे झाले. तसेच इयत्ता अकरावी बारावी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे झाले असून बीएससी एग्रीकल्चर कॉलेज हे शिक्षण डी वाय पाटील कॉलेज तळसंदे येथे पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर उच्च शिक्षण एग्रीकल्चर एम एस सी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे पूर्ण केले. तिने या परीक्षेमध्ये यश मिळवून ऍग्रीकल्चर क्लास वन अधिकारी होण्याचा मान मिळविला आहे. यशामध्ये कुटुंबातील आई-वडील भाऊ तसेच सर्व शिक्षक व मित्रपरिवार यांचा मोठा वाटा आहे.