पाच फुटी सरडा, चौदाशे किलोचा रेडा, बारा लाखाची खिल्लार
schedule13 Feb 26 person by visibility 432 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : पाच फूट लांबीचा सरडा, तब्बल 12 लाख रुपयाचा खिल्लार खौड, 1400 किलो वजनाचा मुरा रेडा आणि तीस लिटर दूध देणारी गाय... हे आहेत यंदाच्या भीमा कृषी प्रदर्शनाची खास वैशिष्ट्ये. कसबा बावडा रोडवरील मेरी वेदर मैदान येथे भीमा कृषी प्रदर्शन भरवले आहे.
खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यंदा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे असे भिमा कृषी व पशु प्रदर्शन १३ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होत आहे.
या प्रदर्शनात खास आकर्षण कोल्हापूरमध्ये प्रथमच पाच फुटाचा इग्वाना (सरडा ) पाहण्यासाठी उपलब्ध आहे. हा सरडा 22 किलो वजनाचा आहे. तो आठ वर्षाचा आहे. या सरड्याची लांबी पाच फूट इतकी आहे. अशी माहिती पशुपालक किशोर चव्हाण यांनी दिली. तसेच बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल, १२ लाखाचा खिल्लार खौंड, १४०० किलोचा मुरा रेडा, ३० लिटर दुध देणारी एच एफ गाय, अमेरिकन शेळ्या, बोकड, असे खास आकर्षण आहेत खास सांगोला, दहिवडीवरुन जातिवंत खिल्लार खोंड व खिल्लार गायी सहभागी होणार आहेत. परभणी, नांदेड, लातूर येथून लालकंधारी व देवणी, एच एफ जर्शी, साहिवाल, गिर इत्यादी जातीची खोंड, गाई आहेत, तसेच पंढरपुरी मुह्रा, मेहसाना, जाफराबादी म्हैस, रेडे सहभागी आहेत. तर जातिवंत घोडे, शेळ्या, मेंढ्या, वराह, विविध जातीच्या कोंबड्या तसेच विविध जातीचे पक्षी आहेत. प्रदर्शनात तांदूळ महोत्सव आहे.
भागीरथी महिला संस्थेच्या वतीने अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना दरवर्षी भिमा कृषी प्रदर्शनात संधी मिळते, यामध्ये दोनशे बचत गट आपली विविध प्रकारची उत्पादने या स्टॉलद्वारे लावतात. महिलांनी बनविलेल्या उत्पादनाला भिमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून थेट बाजारपेठ मिळवून दिली जाते. शिवाय चार दिवस भागीरथी महिला संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत झुणका-भाकरी दिली जाते.याचबरोबर कृषीविषयक आधारित २०० हून अधिक स्टॉल याठिकाणी आहेत.