कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची प्रशासनासोबत चर्चा
schedule12 Feb 26 person by visibility 88 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ येथील महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची विद्यापीठ प्रशासनासोबत बैठक झाली. यामध्ये कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या विविध सेवाविषयक प्रश्नांबाबत चर्चघ् झाली. प्रभारी कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. प्रकुलगुरू ज्योती जाधव, कुलसचिव, डॉ व्ही. एन. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीदरम्यान कास्ट्राईब संघटनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन कुलगुरुंच्या हस्ते झाले. बैठकीस संघटनेचे अध्यक्ष आनंदराव खामकर, उपाध्यक्ष दिनेश उथळे, उदय पवार, सहसचिव दिपक शिंदे, सुनीता वांगीकर, जयश्री माने, संतोष वंगार, प्रकाश श्रावस्ती, प्रशांत देवकर, बाबुराव तीळणे, विलास नरुटे आदी पदाधिकारी तसेच विशेष कक्ष विभागाच्या उपकुलसचिव अंत्रेडी, आस्थापना विभागाचे उपकुलसचिव वैभव ढेरे, सुनिता यादव आदी उपस्थित होते.