भीमा कृषी प्रदर्शनास दिमाखात प्रारंभ, शेतीविषयक माहिती एका छताखाली
schedule13 Feb 26 person by visibility 60 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान ऑरगॅनिक शेतीवर भर कसा द्यावा यावर वेगवेगळ्या पद्धतीचे मार्गदर्शन नेहमीच भीमा कृषी प्रदर्शनात मिळते शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी शेतीवर अधिक भर द्यावा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी भीमा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिलेटची संकल्पना आणली आहारामध्ये मिलेटचा वापर होणे गरजेचे असल्याचे मतही खासदार महाडिक यांनी यावेळी व्यक्त केले
खासदार महाडिक यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले भिमा कृषी व पशु प्रदर्शनाचे फीत कापून थाटात उद्घाटन संपन्न झाले. अध्यक्षस्थानी माजी आमदार महादेवराव महाडिक होते. महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग यांची प्रमुख उपस्थिती होती. कसबा बावडा रोड वरील मेरी वेदर मैदान येथे प्रदर्शन आयोजित केले आहे आहे.
खासदार धनंजय महाडिक यांनी " राज्यात केंद्रात महायुतीची सत्ता आली तसेच आता कोल्हापूर जिल्ह्यात देखील महायुतीने चांगली कामगिरी केलेली आहे.महायुतीच्या माध्यमातून भरपूर प्रकल्प कोल्हापूरला मिळणार आहेत तसेच कोल्हापूर मुंबई विमानसेवा दोन वेळा सुरुवात झाली असून कोल्हापूर मिरज दुहेरी मार्गासाठी ९८४ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. तसेच आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम कोल्हापुरात होणार आहे तसेच सर्किट बेंचचा पाठपुरावा केल्याने आज कोल्हापूरला सर्किट बेंच मिळाले आहे अजून नवनवीन अशी १५ कार्यालय कोल्हापुरात येणार असून रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होतील" असे नमूद केले. महापालिकेच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला.भिमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी आभार मानले.उद्घाटनप्रसंगी भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, गोकुळ संचालक अबरिश घाडगे, भागीरथी महिला संस्था अध्यक्षा अरुंधती महाडिक आदी उपस्थित होते.