Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळचा दूध वाढ गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम, गावनिहाय पाच वर्षाचे मायक्रो प्लॅनिंगरग्गेडियन जिमचा चौथा वर्धापनदिन उत्साहात; रामकृष्ण हॉलमध्ये रंगला दिमाखदार सोहळा कुलगुरू राजनीश कामत  यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कारअभियंत्यांच्या योगदानातून साकारेल आत्मनिर्भर भारत – मेजर अभिजीत ताम्हणकरमाजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे निधनकोल्हापूरच्या खंडपीठासाठी ४९५ पदांची नजीकच्या काळात भरती - न्यायमूर्ती रविंद्र घुगेजिल्हा परिषदेत ८० वा स्वातंत्र्यदिन साजरापाच चित्रकारांच्या कलाकृतींचे मुंबईत प्रदर्शनआता केएमटीच्या जागेवर डोळा, दोन भूखंड तीस वर्षासाठी भाडयाने देण्याचा प्रस्तावफुटबॉलच्या येत्या हंगामापासून मुलींच्यासाठी शाहू छत्रपती वूमेन्स लीग - मधुरिमाराजे छत्रपती

जाहिरात

 

आता केएमटीच्या जागेवर डोळा, दोन भूखंड तीस वर्षासाठी भाडयाने देण्याचा प्रस्ताव

schedule17 Aug 26 person by visibility 35 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन विभागातंर्गत केएमटीकडील दोन भूखंड तीस वर्षे करारने भाडयाने देण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे. शिरोली एमआयडीसी येथील ही जागा असून यासंदर्भातील प्रस्ताव येत्या १९ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे. या ठिकाणी केएमटीकडून ई बससाठी डेपो उभारणी प्रस्तावित होती. नवीन ई बसेस कोल्हापुरात दाखल होत आहेत. मात्र केएमटी प्रशासनाकडून दोन भूखंड तीस वर्षासाठी खासगी विकसकाकडे भाडयाचे देण्याचे नियोजन होत आहे. केएमटीची जागा खासगी विकसकाला भाडयाने देऊन उत्पन्न वाढविण्यासाठी हा प्रस्ताव आणला आहे. दरम्यान केएमटीकडील जागा खासगी  विकसकाला भाडयाने दिल्यास ई बस डेपोसाठी जागा कुठून उपलब्ध करणार असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes