Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळचा दूध वाढ गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम, गावनिहाय पाच वर्षाचे मायक्रो प्लॅनिंगरग्गेडियन जिमचा चौथा वर्धापनदिन उत्साहात; रामकृष्ण हॉलमध्ये रंगला दिमाखदार सोहळा कुलगुरू राजनीश कामत  यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कारअभियंत्यांच्या योगदानातून साकारेल आत्मनिर्भर भारत – मेजर अभिजीत ताम्हणकरमाजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे निधनकोल्हापूरच्या खंडपीठासाठी ४९५ पदांची नजीकच्या काळात भरती - न्यायमूर्ती रविंद्र घुगेजिल्हा परिषदेत ८० वा स्वातंत्र्यदिन साजरापाच चित्रकारांच्या कलाकृतींचे मुंबईत प्रदर्शनआता केएमटीच्या जागेवर डोळा, दोन भूखंड तीस वर्षासाठी भाडयाने देण्याचा प्रस्तावफुटबॉलच्या येत्या हंगामापासून मुलींच्यासाठी शाहू छत्रपती वूमेन्स लीग - मधुरिमाराजे छत्रपती

जाहिरात

 

पाच चित्रकारांच्या कलाकृतींचे मुंबईत प्रदर्शन

schedule17 Aug 26 person by visibility 45 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : चित्रकला एक वैश्विक भाषा आहे. यातून चित्रकार मनातलं मनापासून सांगत असतो. अशाच पाच कलाकारांच्या स्वतंत्र कलादृष्टीचा अनुभव देणारे ‘द सिक्स्थ सेन्स’ हे समूह कला प्रदर्शन मुंबई येथे होत आहे. याचे उद्घाटन मंगळवारी (दि. १८ आॅगस्ट) सायंकाळी ५ वाजता काला घोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीच्या हॉलमध्ये होणार आहे. या कार्यक्रमासाठी बीएसई इन्व्हेस्टमेंट्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक शंकर जाधव, आमदार रोहित पवार, कला संचालक डॉ. किशोर इंगळे आणि कला व संस्कृतीच्या समर्थक चित्रा मेटे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती आहे.  ‘द सिक्स्थ सेन्स’ ही संकल्पना कलाकृतीकडे केवळ दृश्य म्हणून न पाहता, तिच्यामागील अंतर्ज्ञान, भावना आणि संवेदना अनुभवण्यावर भर देते. शब्दांच्या पलीकडे जाऊन कला आणि प्रेक्षक यांच्यात निर्माण होणाºया अंतर्गत संवादाचा शोध या प्रदर्शनातून घेण्यात आला आहे. अजय दळवी (कोल्हापूर ), कविता साळुंखे (पुणे ), दीपक थोपटे (पुणे ), डॉ. तानाजी अवघडे (कराड) आणि सुरेंद्र कुडपणे पाटील (पुणे) यांच्या कलाकृती मांडल्या आहेत. पाचही कलाकारांच्या कलाप्रवासाची दिशा वेगळी असून, रंग, भावना, पोत, भूमितीय रचना, शिल्प आणि लँडस्केप यांच्या माध्यमातून त्यांनी स्वतंत्र कलाभाषा विकसित केली आहे. वेगवेगळ्या अभिव्यक्ती असूनही त्यांना जोडणारा समान धागा म्हणजे अंतर्मनातून येणारी कलाजाणीव. विविध कलादृष्टींचे एकत्रित हे प्रदर्शन दि. २४ ऑगस्टपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत खुले राहणार आहे. या प्रदर्शनाला रसिकांनी भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

………………

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes