Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढणार, मंत्री मुश्रीफ आमच्या सोबत असतील - धनंजय महाडिकवडिलांना मिठी मारताच नवीद मुश्रीफ झाले भावूककोल्हापूर महानगर भाजप अध्यक्षपदी विजय जाधवस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी सरसावली, नेतेमंडळीची पदाधिकाऱ्यांच्यासोबत संयुक्त बैठक जागतिक स्तरावरील कॅन्सर उपचार आता कोल्हापुरात !णणजझ तवैद्यकीय सेवेबद्दल सिद्धगिरी जननीच्या डॉ. वर्षा पाटील यांचा सन्मानमहाडिकांकडून नविद मुश्रीफांचे अभिनंदन, विरोधकांवर निशाणा !अध्यक्ष महायुती की महाविकासचा ? नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळात हम सब एक है, सहकार हा आमचा धर्म !कोल्हापूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांची गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्यासोबत बैठक, रेल्वे प्रकल्पासह सर्किट बेंचसंबंधी चर्चा!

जाहिरात

 

गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरून नवा ट्विस्ट, नेत्यांची अडीच तास खलबते ! नावाचा सस्पेन्स कायम!!

schedule29 May 25 person by visibility 906 category

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदाची निवड काही तासावर आले असताना अध्यक्षपदाच्या नावावरून नवा ट्विस्ट तयार झाला आहे. सर्व समावेशक चेहरा अध्यक्षपदी निवडला जाईल असे नेते मंडळींनी सांगितले असले तरी गुरुवारी पुन्हा एकदा  सगळे नेतेमंडळी एकवटल्याने नवा अध्यक्ष कोण हा सस्पेन्स कायम राहिला. गोकुळ मधील सत्ताधारी आघाडीत असलेल्या महायुतीच्या नेतेमंडळीवर गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा झाला पाहिजे असा मुंबईवरून निरोप आल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे गुरुवारी पुन्हा एकदा राजकीय घडामोडी वेगावल्या. संध्याकाळी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये गोकुळ मधील सत्ताधारी नेते मंडळींची अडीच तास बैठक झाली.  सायंकाळी पाच वाजता सुरू झालेली बैठक रात्री साडेसात वाजता संपली.  नेतेमंडळीच्या बैठकीनंतर संचालकासोबत पुन्हा बैठक झाली. या बैठकीत नेत्यांनी, नवीन अध्यक्षपदाबाबत सगळ्यांनी एकदिलाने निर्णय घेतला आहे. बंद पाकीटातून शुक्रवारी तो कळवला जाईल. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्याकडे पाकीट दिले जाईल असे सांगितले. यावेळी पत्रकारांनी गोकुळचा नवा अध्यक्ष कोण महाविकास आघाडीचा की महायुतीचा असा प्रश्न केल्यावर मंत्री हसन मश्रीफ म्हणाले हम सब एक है. तर आमदार सतेज पाटील म्हणाले, राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीचा अध्यक्ष होईल. दरम्यान गोकुळचा नवा अध्यक्ष कोण हा सस्पेन्स कायम राहिला.
 विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नूतन अध्यक्ष निवडीसाठी शुक्रवारी 30 मे रोजी संचालकांची बैठक होत आहे. गेले पंधरा दिवस गोकुळच्या अध्यक्षपदावरून चांगलेच राजकीय नाट्य रंगले. विद्यमान अध्यक्ष डोंगळे यांनी गोकुळचा नवीन अध्यक्ष महायुतीचा झाला पाहिजे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याचे म्हटले. यामुळे गोकुळच्या राजकारणाला चांगलीच उकळी मिळाली. अध्यक्ष डोंगळे यांनी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. त्यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनामावरून गोकुळमधील  सत्ताधारी आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली होती. डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन अध्यक्ष निवडीसाठी हालचाली वेगावले. गोकुळ मधील सत्ताधारी आघाडीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय कोरे, माजी आमदार संजय घाटगे यांची काही दिवसांपूर्वी सर्किट हाऊस येथे बैठक झाली. या बैठकीत गोकुळच्या अध्यक्षपदी सर्व समावेशक चेहरा असेल असे त्यांनी स्पष्ट केले. गोकुळचे संस्थापक अध्यक्ष आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव व गोकुळचे संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव आघाडीवर होते. शुक्रवारी नूतन अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया होणार आहे. त्यापूर्वीच गुरुवारी पुन्हा एकदा गोकुळ मधील राजकारण चांगलेच रंगले.
 वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के पी पाटील, संजय घाटगे यांची बैठक सुरू झाली. सायंकाळी सहा वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे जिल्हा मध्यवर्ती बँकेत दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा चर्चेला सुरुवात झाली. रात्री साडेसात वाजता बैठक संपली. या बैठकीत गोकुळच्या अध्यक्षपदासाठी नाव निश्चित झाल्याचे नेत्याने सांगितले. आम्ही सगळे एक दिलाने काम करत आहोत. नाव निश्चित झाले आहे शुक्रवारी ते बंद पाकिटातून कळवले जाईल असेही नेत्यांनी स्पष्ट केले. मात्र या साऱ्या घडामोडीत गोकुळचा नवा अध्यक्ष कोण हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी होता. नेत्यांनी नाव निश्चित केले असले तरी नवीन अध्यक्षाबाबत सस्पेन्स कायम राहिला. गोकुळच्या राजकारणाने परत एकदा नव्याने वळण घेतले आहे. त्यामुळे नवा अध्यक्ष कोण ?   सर्वसमावेशक चेहरा म्हणून शशिकांत पाटील यांना पसंती की अजित नरके, अंबरिश घाटगे, अमरसिंह पाटील, नाविद मुश्रीफ, अभिजीत तायशेट्टे यांना संधी दिली जाते याविषयी उत्कंठा वाढली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes