Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
न्यू कॉलेज ऑफ फार्मसीचा उंचगावमध्ये स्वच्छता उपक्रमबँकॉकमधील हायरॉक्स स्पर्धेत कोल्हापूरच्या अक्षय मानेची दमदार कामगिरीआयुर्वेदाचार्य डॉ. सुनील पाटील यांचे निधनआता मुख्याध्यापक होणार माहितीतज्ञ ; यशदा - माध्यमिक शिक्षण विभागाचा विशेष कार्यक्रम  विनय प्रकाशदीपने उजळल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील वर्गखोल्याऑर्केस्ट्रा कलावंतांच्या जीवनावरील पुस्तक वेगळी अनुभूती देईलकेआयटीची अभिनव संकल्पना, कल्पनेपासून उद्योगापर्यंत! २१ ऑगस्टला एकदिवसीय कार्यशाळा ! !झंवर ग्रुपकडून विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरणप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एक लाख ३६ हजार कुटुंबांचे आवास प्लस सर्व्हेक्षण, पंधरा ऑगस्टला ग्रामसभेत यादी मंजुरीची कार्यवाहीअधिकारी बदलले, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाला मुहूर्त लागेना ! सादरीकरणासाठी रोज नवीन तारीख ! !

जाहिरात

 

केआयटीची अभिनव संकल्पना, कल्पनेपासून उद्योगापर्यंत! २१ ऑगस्टला एकदिवसीय कार्यशाळा ! !

schedule14 Aug 26 person by visibility 60 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नाविन्यपूर्ण कल्पनेला केवळ कल्पनेपुरते मर्यादित न ठेवता तिचे बाजारपेठेतील यशस्वी उत्पादन किंवा सेवेत रूपांतर करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देणाऱ्या ‘कल्पनेपासून उद्योगापर्यंत – कल्पनेचे यशस्वी उद्योगात रूपांतर’ या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केआयटीच्या इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत केआयटी कॉलेजमधील इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन विभागात होणार आहे. विद्यार्थी, संशोधक, नवउद्योजक, स्टार्टअप संस्थापक, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक तसेच व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी कार्यशाळा खुली आहे.
कल्पनेपासून बाजारपेठेपर्यंतचा संपूर्ण प्रवास समजून घेण्यासाठी कार्यशाळेत व्यवसाय संधी ओळखणे, ग्राहकांच्या गरजांची पडताळणी, बाजारपेठेचा अभ्यास, व्यवसाय प्रारूप तयार करणे, शासकीय योजना, निधीची उपलब्धता, उद्योगवर्धन आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

प्रकल्प प्रमुख डॉ. मोहन वनरोट्टी, सुधीर आरळी प्रदीप रासनकर, देवेंद्र पाठक आणि समीर पुनसकर हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, महाराष्ट्र शासन, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार आणि निधी आय-टीबीआय यांच्या सहकार्याने कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या विद्यार्थी, संशोधक आणि नवउद्योजकांनी ‘कल्पनेपासून उद्योगापर्यंत’ कार्यशाळेत सहभागी होऊन आपल्या कल्पनेला उद्योगाची दिशा द्यावी व या संधीचा लाभ घ्यावा,” असे आवाहन वनरोट्टी यांनी केले. केआयटीचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष  सचिन मेनन आणि सचिव  दीपक चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यशाळेसाठी नोंदणी सुरू असून जागा मर्यादित आहेत. इच्छुकांनी नोंदणी शुल्क भरून १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी केआयटी आय.आर.एफ च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा येथील केआयटी कॉलेजमधील कार्यालयाशी संपर्क साधावा.


 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes