Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
न्यू कॉलेज ऑफ फार्मसीचा उंचगावमध्ये स्वच्छता उपक्रमबँकॉकमधील हायरॉक्स स्पर्धेत कोल्हापूरच्या अक्षय मानेची दमदार कामगिरीआयुर्वेदाचार्य डॉ. सुनील पाटील यांचे निधनआता मुख्याध्यापक होणार माहितीतज्ञ ; यशदा - माध्यमिक शिक्षण विभागाचा विशेष कार्यक्रम  विनय प्रकाशदीपने उजळल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील वर्गखोल्याऑर्केस्ट्रा कलावंतांच्या जीवनावरील पुस्तक वेगळी अनुभूती देईलकेआयटीची अभिनव संकल्पना, कल्पनेपासून उद्योगापर्यंत! २१ ऑगस्टला एकदिवसीय कार्यशाळा ! !झंवर ग्रुपकडून विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरणप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एक लाख ३६ हजार कुटुंबांचे आवास प्लस सर्व्हेक्षण, पंधरा ऑगस्टला ग्रामसभेत यादी मंजुरीची कार्यवाहीअधिकारी बदलले, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाला मुहूर्त लागेना ! सादरीकरणासाठी रोज नवीन तारीख ! !

जाहिरात

 

झंवर ग्रुपकडून विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरण

schedule14 Aug 26 person by visibility 37 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी संचलित नूतन मराठी विद्यालय हायस्कूल मध्ये कास्टिंग उद्योगामध्ये अग्रगण्य असलेल्या कोल्हापूर येथील झंवर ग्रुपच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वितरण समारंभ  संपन्न झाला.  अनेक वर्षे होतकरू विद्यार्थ्यांना या समूहाकडून गणवेश वितरित केले जातात. यावेळी 46 विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले.     दि .प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या नियमक मंडळाचे सदस्य प्रकाश मेहता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. झंवर ग्रुपचे प्रतिनिधी ओंकार जोशी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. जिमखाना प्रमुख रश्मी भागवत यांनी प्रास्ताविक केले.ओंकार जोशी यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या मनोगतातून स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा ,स्वप्न पहा पण अतिशय प्रामाणिकपणे आपलं जीवन घडवा असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय समारोप प्रकाश मेहता यांनी केला. आभार संजीवनी देशपांडे यांनी मानले. विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन तृप्ती मंगल यांनी केले.सूत्रसंचालन वैष्णवी भोसले यांनी केले .या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes