Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बाजार समितीत पदाधिकारी बदलाचे राजकारण दमदार ! सभापती - संचालक मंडळाची कामगिरी मात्र सुमार !!अंजू तुरंबेकर देणार भूतानच्या महिला फुटबॉलपटूना प्रशिक्षणश्रीराम पचिंद्रे यांच्या शाहू कादंबरीतील पाठ शालेय अभ्यासक्रमात​ बाजार समितीतील पदोन्नती प्रकरणातील दोषींवर कारवाई करा; भाजप सहकार आघाडीचे सचिवांना निवेदन करवीरमधील ७० दूध संस्थांची सुनावणी, पन्हाळा- गगनबावडातील दूध संस्थांना नोटीसपदवीधर मतदार संघावर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे : आमदार राजेश क्षीरसागरनवकार महामंत्र पठण कार्यक्रमात जिल्ह्यात ३४ हजार जणांचा सहभागप्रायव्हेटच्या चेअरमनपदी डॉ. सुनील कुबेर, व्हाइस चेअरमनपदी मिलिंद करमळकरसरकारी योजना विनाविलंब लोकांपर्यंत पोहोचवा, जिप उपाध्यक्षांच्या अधिकाऱ्यांना सूचनारामसिना ग्रुपमध्ये माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे यांची प्रेरणादायी भेट

जाहिरात

 

​ बाजार समितीतील पदोन्नती प्रकरणातील दोषींवर कारवाई करा; भाजप सहकार आघाडीचे सचिवांना निवेदन

schedule10 Apr 26 person by visibility 58 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सेवा ज्येष्ठता डावलून करण्यात आलेल्या पदोन्नती रद्द झाल्यानंतर, आता या संपूर्ण गैरप्रकाराला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधीर देसाई यांचे नेतृत्वात  बाजार समितीचे सचिव तानाजी दळवी यांना निवेदन दिले. बाजार समिती प्रशासनाने काही दिवसांपूर्वी सेवा ज्येष्ठतेचे नियम धाब्यावर बसवून काही कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली होती. या निर्णयाविरोधात बाजार समितीच्या काही संचालकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन प्रशासनाला अखेर त्या पदोन्नती रद्द कराव्या लागल्या. मात्र, केवळ पदोन्नती रद्द करून हे प्रकरण थांबवू नये, तर नियमबाह्य पदोन्नतीची प्रक्रिया राबवून संस्थेची दिशाभूल करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर आणि दोषींवर प्रशासकीय कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आलीं. ​यावेळी भाजप सहकार आघाडीचे सरचिटणीस सुधीर बोलवे, उपाध्यक्ष अनिल कोळेकर, प्रशांत दिघे, ईश्वरा पाटील,  चिटणीस प्रसाद खोत, व्यापारी प्रतिनिधी अमोल कापसे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes