Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांना पितृ‌शोककोल्हापुरातील इंडस्ट्रीजसाठी महिनाभरात उद्योगमंत्र्यांच्यासोबत बैठक – आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरसीएचबी प्राध्यापकांची मानधनवाढ, सेवास्थैर्य, अकरा महिन्याच्या नियुक्तीसाठी सरकारदरबारी पाठपुरावा करणारमहायुतीच्या सत्ताकाळात पेपर आहेत पण परीक्षा लिक, डिग्री आहेत पण नोकरी नाही, स्थिती बदलण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या - हर्षवर्धन सपकाळपहिल्या फेरीतच कौस्तुभ गावडे यांना विजयी करणार, कोल्हापुरातील मेळाव्यात निर्धारठरावधारकांच्या बैठकीत महायुतीमधील पदाधिकाऱ्यांत वादावादी, शपथ घेण्यावरुन  विषय चिघळलाशंकर खंडू पाटील जन्मशताब्दी सरकारतर्फे साजरी होणार, कोल्हापुरात १४ नोव्हेंबरला कार्यक्रमकोल्हापूरचा स्वाभिमान राखण्यासाठी समविचारी आघाडीला  विजयी करा - सतेज पाटीलसेवा संकल्प अभियानातून विद्या मंदिर, भेंडाई धनगरवाडा शाळेला नवे रूपकरवीर तालुका डाग पुसून काढणार, ठरावधारकांचा निर्धार ! महायुतीच्या नेतेमंडळीत आणाभाका ! !

जाहिरात

 

कोल्हापुरातील इंडस्ट्रीजसाठी महिनाभरात उद्योगमंत्र्यांच्यासोबत बैठक – आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

schedule14 Oct 26 person by visibility 111 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: ‘कोल्हापुरातील औद्योगिक वसाहती, उद्योग- व्यवसाय आणि कारखानदारीच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली येत्या महिनाभरात कोल्हापुरात बैठक घेऊ.’ अशी ग्वाही आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. तसेच नगरविकास विभागाच्या सचिवासोबत भेट घडवून आणू असे सांगितले.

 कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रीकल्चर (एमएसीसीआयए) व कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उद्योग संवाद’कार्यक्रम आयोजित केला होता. एमएसीसीआयएचे अध्यक्ष रवींद्र माणगावे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार जयश्री जाधव, एमएसीसीआयए ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेडणेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, विश्वस्त भालचंद्र पाटील, आनंद माने यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी सहकार्य केलेल्या चंदुलाल सराफ ज्वेलर्सचे राजेंद्र जैन, अतुल शहा, ऑपरेशन हेड योगेश शहा यांचा सत्कार करण्यात आला.

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी प्रास्ताविकांत कोल्हापुरातील औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधा, आवश्यक उपाययोजना यासंबंधी ऊहापोह केला. गोकुळ शिरगाव, शिरोली, कागल एमआयडीसीतील प्रश्नांकडे लक्ष वेधले. एमएसीसीआयचे अध्यक्ष माणगावे यांनी, ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे उद्योग, व्यावसायिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसोबतच नव उद्योजक घडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. कारखानदारीसह एमआयडीसीसाठी आवश्यक सुविधा, भविष्यकालीन नियोजनासंबंधी उद्योग संवाद कार्यक्रम आयोजित केला आहे. उद्योग, व्यावसायिकांना एकत्र करुन मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला जाईल.’ यावेळी कारखानदार  व उद्योग व्यावसायिकांनी इंडस्ट्रीजसंबंधी प्रश्न मांडले. याप्रसंगी चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष राजू पाटील, इंजिनीअरिंग असोसिएशनचे कमलकांत कुलकर्णी, भरत जाधव,दीपक चोरगे, संचालक राहुल नष्टे, अजित कोठारी, संपत पाटील, प्रशांत शिंदे, शांताराम सुर्वे, रामराजे बदाले, मोहन कुशिरे, सचिन शानबाग, सिद्धार्थ लाटकर धनंजय दुग्गे, विज्ञानंद मुंडे, राहुल मेंच, प्रल्हाद जोशी, अनिल धडाम आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes