Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वार्षिक तपासणीवेळी प्रत्येक मुख्याध्यापकाकडे शाळेची यशोगाथा हवी ;  सहविचार सभेत उपशिक्षणाधिकाऱ्यांनी केली १७ विषयांवर चर्चादिवा विझला कायमचा….शिक्षक पात्रता परीक्षा होणार ऑनलाइन ! राज्य परीक्षा परिषदेचे आयबीपीएसला पत्र ! !उद्योगांनी नावीन्य - गुणवत्ता - आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनावे - खासदार धनंजय महाडिकमहादेव डावरे यांचे कार्य  शिक्षकांना दिशादर्शक : भरत रसाळेमहिला - बाल कल्याण देणार मशरुम-आटाविरहीत व्हीट ब्रेड तयारचे प्रशिक्षणडॉ. संजय डी. पाटील यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार प्रदानगोकुळच्या माजी चेअरमनांची टोलेबाजी ! जुळे भाऊपासून बापापर्यंत उपमा, जिल्ह्यातील नेत्यांचाही चिमटा ! !शिक्षण विभागातील अकरा अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोल्हापूर - सांगलीतील अधिकाऱ्यांचा समावेश श्रीपूजक मंडळ - समिधा प्रतिष्ठानतर्फे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

जाहिरात

 

भागीरथी महिला संस्थेतर्फे कोल्हापुरातील बालाजी पार्कमध्ये वैद्यकीय तपासणी

schedule01 Jul 26 person by visibility 53 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  निरोगी आणि व्याधीमुक्त शरीर हीच खरी संपत्ती आहे. आजच्या धावपळीच्या युगात अनेकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अशा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून, वैद्यकीय तपासणी करुन नागरिकांनी वेळीच आरोग्याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी केले. डॉक्टर्स डे निमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने झालेल्या वैद्यकीय तपासणी शिबिरात त्या बोलत होत्या. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची वैद्यकीय तपासणी झाली. तसेच डेंटीस्टकडून नागरिकांच्या दातांची तपासणी करून गरजेनुसार उपचार करण्यात आले. रामानंदनगर येथील बालाजी पार्कमध्ये, वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले. गोपालकर क्लिनिकच्या सहकार्याने झालेल्या या शिबिराला नगरसेवक विजयसिंह खाडे, युवराज माने, डॉ. सुप्रिया गोपालकर, डॉ. सुनिती गोपालकर, डॉ. सोहम गोपालकर, डॉ. शुभम पाटील, डॉ. विजयकुमार गोपालकर, डॉ. तिलोत्तमा गोपालकर, डेंटीस्ट डॉ. निकीता कापसे, गर्जना आखाड्याचे अध्यक्ष नाना सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी भागीरथी संस्थेच्या स्वयंसेविका स्नेहल खाडे, राधा मेस्त्री, ऐश्वर्या देसाई, मीना पाटील, खाटिक समाजाच्या अध्यक्षा सुनीता घोडके, बालाजी हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी तुपारे, सचिव राजाराम निकम उपस्थित होते..

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes