Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांचे निधन बागेश्वर महाराजवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, कोल्हापुरात शिवभक्तांची मागणीविवेकानंद  कॉलेजमध्ये  राजेंद्र साळुंखे  यांचा  सेवानिवृत्तीनिमत्त सत्कारशहर स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास आरोग्य निरीक्षक - मुकादमांवर कारवाई ! आयुक्त करणार पहाटेही तपासणी ! !जिपच्या स्थायी सभेत ग्रामीण प्रश्नांना वाचा, गारगोटीतील पाणी योजनेचे काम संथगतीने !गैरहजर अधिकाऱ्याना नोटिस !!गोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश- नविद मुश्रीफ यांची माहिती कोरोनाशी भिडताना हे पुस्तक एका संकटाचा दस्ताऐवज नसून मानवी जिद्दीची गाथा - मंत्री हसन मुश्रीफरूट ३२ मुक्तहास्य स्पर्धा, विजेत्यांना लाख रुपयांची बक्षीसेकोल्हापुरात तीस एप्रिलपासून एक दिवसआड पाणी पुरवठामहाराष्ट्र जैन साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर ! वसंत भोसले, महावीर अक्कोळे, निलम माणगावेंचा समावेश ! !

जाहिरात

 

महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर ! वसंत भोसले, महावीर अक्कोळे, निलम माणगावेंचा समावेश ! !

schedule28 Apr 26 person by visibility 115 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सामाजिक, पत्रकारिता व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र जैन साहित्य परिषद, कोल्हापूरतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आणि लठ्ठे फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. भरत लठ्ठे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम एक मे २०२६ रोजी होत आहे. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीध्ये दसरा चौक परिसरातील दिगंबर जैन बोर्डिंगमधील सभागृहात हा कार्यक्रम दुपारी तीन वाजता होणार असल्याची माहिती चेअरमन प्रा. डी.ए. पाटींल यांनी दिली.

 संपादक वसंत भोसले यांना स्वस्तिश्री चंद्रकीर्ती लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वर्गीय जी. के. पाटील उत्कृष्ट संपादक पुरस्कार जयसिंगपूर येथील डॉ. महावीर अक्कोळे यांना जाहीर झाला. डॉ. ए. एन. उपाध्ये ज्येष्ठ साहित्यिक पुरस्कार बारामती येथील साहित्यिक धनंजय शहा यांना घोषित झाला. दिवाणबहाद्दर अण्णासाहेब लठ्ठे पत्रकार पुरस्कार कोल्हापुरातील पत्रकार विद्याधर पिंपळे यांना घोषित झाला. जोहडकार सौ. सुरेखा शहा ज्येष्ठ महिला साहित्यिक पुरस्कार जयसिंगपूर येथील कवयित्री निलम माणगावे यांना देण्यात येणार आहे. परपमूज्य १०५ आर्यिका जिनचंद्रजी उत्कृष्ट सामाजिका महिला श्राविकारत्न पुरस्कार जयसिंगपूर येथील विमल देवगोंडा पाटील यांना जाहीर झाला. या कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला सचिव संजय पाटील, बोर्डिंगचे चेअरमन विजयकुमार शेट्टी, अधीक्षक जयवंत कोले उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes