Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांचे निधन बागेश्वर महाराजवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, कोल्हापुरात शिवभक्तांची मागणीविवेकानंद  कॉलेजमध्ये  राजेंद्र साळुंखे  यांचा  सेवानिवृत्तीनिमत्त सत्कारशहर स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास आरोग्य निरीक्षक - मुकादमांवर कारवाई ! आयुक्त करणार पहाटेही तपासणी ! !जिपच्या स्थायी सभेत ग्रामीण प्रश्नांना वाचा, गारगोटीतील पाणी योजनेचे काम संथगतीने !गैरहजर अधिकाऱ्याना नोटिस !!गोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश- नविद मुश्रीफ यांची माहिती कोरोनाशी भिडताना हे पुस्तक एका संकटाचा दस्ताऐवज नसून मानवी जिद्दीची गाथा - मंत्री हसन मुश्रीफरूट ३२ मुक्तहास्य स्पर्धा, विजेत्यांना लाख रुपयांची बक्षीसेकोल्हापुरात तीस एप्रिलपासून एक दिवसआड पाणी पुरवठामहाराष्ट्र जैन साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर ! वसंत भोसले, महावीर अक्कोळे, निलम माणगावेंचा समावेश ! !

जाहिरात

 

शहर स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास आरोग्य निरीक्षक - मुकादमांवर कारवाई ! आयुक्त करणार पहाटेही तपासणी ! !

schedule29 Apr 26 person by visibility 123 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : शहरातील स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास संबंधित आरोग्य निरीक्षक व मुकादमांवर कारवाई करण्यात येईल, आरोग्य निरीक्षकांनी केवळ कार्यालयात न बसता प्रत्यक्ष भागात फिरती करुन काम करावे. मी पहाटे कधीही फिरती करुन तपासणी करणार आहे.’ असा इशारा आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिला. शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने  सर्व आरोग्य निरीक्षक व मुकादमांची आढावा बैठक घेण्यात आली.

आयुक्त  म्हणाले, ‘शहरातील रस्त्यांवर कचरा साचल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. अशा स्थितीत संबंधित मुकादम व आरोग्य निरिक्षकांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल. ज्या प्रभागात कचरा अधिक प्रमाणात आढळेल, त्या ठिकाणच्या मुकादमांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे. शहर स्वच्छ राहिल्यास नागरिकांच्या तक्रारींमध्ये पन्नास टक्क्यांनी घट होईल.  आठवडयामधील सहा दिवसात आपले काम व्यवस्थित पार पाडणे गरजेचे आहे. मी आल्यापासून ४० हून अधिक कर्मचा-यांची लाड पागे शिफारशी अंतर्गत नियुक्तीच्या फाईल्सचा निपटारा केला आहे.

आपले शहर स्वच्छ व सुंदर कसे होईल हि आपली जबाबदारी आहे. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडणे गरजेचे आहे. मुकादमांनीही कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे. उन्हाळयापुरते कामाचे नियोजन करता येते का हे सर्वांनी सांगावे. यावेळी सर्वानुमते पहाटे पाच ते एक या वेळेमध्ये स्वच्छतेची वेळ निश्चित करण्यात आली. सध्या १५७५ कर्मचारी स्वच्छतेसाठी आहेत आणखीन कर्मचा-यांची नियुक्ती लवकरच होणार आहे. यामध्ये महापालिकेच्या हद्दीत आलेल्या तावडे हॉटेल ते गांधीनगरचा एरियामध्ये आता आपल्याला स्वच्छता सुरु करायची आहे. त्यामुळे नव्याने नियुक्त काही कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती केली जाईल. एक महिन्यात मला स्वच्छतेत बदल दिसला पाहिजे. प्रत्येकाने दररोज आठ तास प्रामाणिकपणे काम केल्यास शहर स्वच्छ व सुंदर होऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला. तसेच फेरीवाल्यांकडून कचरा संकलनासाठी शुल्क आकारण्याच्या सूचना केल्या.  बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त परितोष कंकाळ, सहाय्यक आयुक्त विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes