विवेकानंद कॉलेजमध्ये राजेंद्र साळुंखे यांचा सेवानिवृत्तीनिमत्त सत्कार
schedule30 Apr 26 person by visibility 74 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : येथील विवेकानंद कॉलेजमधील कर्मचारी राजेंद्र साळुंखे, हे ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने त्यांचा, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे व कोल्हापूर विभागप्रमुख डॉ. श्रीराम साळुंखे यांच्या हस्ते मानपत्र, शाल श्रीफळ, पोशाख देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात रोपास पाणी घालून झाली. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या पतसंस्थेचे अध्यक्ष हितेंद्र साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. मानपत्राचे वाचन अमित साळुंखे यांनी केले. याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे मा. कौस्तुभ गावडे म्हणाले, सेवा बजावत असताना कामावर निष्ठा ठेवून काम करा म्हणजे असा सेवागौरव होतो व प्रामाणिकपणाच्या सेवेचे फळ मिळते.डॉ. श्रीराम साळुंखे म्हणाले, कुटुंबातील अबाधित ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणजे राजेंद्र साळुंखे. त्यांनी दोन पिढ्यांमधील जिव्हाळा जपला. यावेळी प्रा. प्रकाश साळुंखे, भरत कवठेकर, राजकुमार देसाई, प्रतीक साळुंखे, अनिल पवार, डॉ. नीता पाटील प्रा.मनीषा साळुंखे यांनी मनोगते मांडली.
सत्काराला उत्तर देताना राजेंद्र साळुंखे म्हणाले, या विवेकानंद शिक्षण संस्थेमुळे माझे जीवन घडले मला सामाजिक मान सन्मान मिळाला, माझे कुटुंब स्वावलंबी झाले, त्याबद्दल मी या संस्थेचा आजन्म ऋणी राहीन. प्राचार्य डॉ. सी बी पाटील यांनी सेवानिवृत्ती हा भावनिक क्षण असल्याचे सांगून त्यांनी सेवानिवृत्तीनंतरच्या आरोग्यदायी व सुखी समाधानी जीवनासाठी साळुंखे यांना शुभेच्छा दिल्या. अमर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. बबन करपे यांनी आभार मानले.