Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गांधीनगर परिसरातील अनाधिकृत बांधकामावर उद्यापासून कारवाईडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची  शंभर टक्के निकालाची परंपरा कायमब्राह्मण सभा करवीरतर्फे ग्रंथदिंडी, ४० वारकरी बालचमूंचा सहभागरोटरी सेंट्रलच्या अध्यक्षपदी डॉ. भूषण शेंडगे, सचिवपदी अविनाश चिकनीसअमित शहांच्या सभेत संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा, एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी काढले बाहेरभारत म्हणजे धर्मशाळा नव्हे, एक- एक घुसखोर शोधून देशाबाहेर घालवू - अमित शाहअंबाबाई मंदिर विकास आराखडयामुळे धार्मिक पर्यटनासह स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळशहरात २२ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठाटीईटीसाठी कोल्हापूर केंद्रावर उच्चांकी परीक्षार्थी, नागमोडी बैठक व्यवस्थाशिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त कोल्हापुरात जल्लोष; शिवाजी चौकात जिलेबी वाटप

जाहिरात

 

रूट ३२ मुक्तहास्य स्पर्धा, विजेत्यांना लाख रुपयांची बक्षीसे

schedule28 Apr 26 person by visibility 304 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : कोल्हापूर मेडिकल असोसिएशन येथील सभागृहात  रूट ३२ मुक्तहास्य स्पर्धा २०२६ चे उद्घाटन झाले कोल्हापूरच्या नागरिकांमधे मौखिक आरोग्याबद्दल जागृती करण्याच्या उद्देशाने इंडियन डेन्टल असोसिएशन ( आयडीए) कोल्हापूरच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. १ मे २०२६ ते १ ऑक्टोबर २०२६ या ५ महिन्यांपैकी किमान ३ महिने आयडीए सभासदाच्या दवाखान्यात जाऊन सल्ला व उपचार करून घेऊन अंतिम फेरीसाठी पात्र व्हायचे आहे. अंतिम फेरीतील विजेत्यामधे लाख रुपयांची बक्षीसे वितरित केली जातील. ही स्पर्धा रूट ३२ या मौखिक आरोग्य उत्पादक कंपनीने प्रायोजित केली आहे . या स्पर्धेचे उद्घाटन करताना केएमए अध्यक्ष म्हणाले,‘ नागरीक आणि डॉक्टर यांचे नाते अधिक दृढ करणारी ही स्पर्धा आहे. आयडीएला आणखी समाजोपयोगी उपक्रम करायचे असतील तर केएमए सदैव पाठीशी राहील.’ राज्य आयडीए सचिव डॉ विकास पाटील यांनी,”शहरातील नागरिकांनी  या योजनेचा फायदा घ्यावा” असे आवाहन केले. आयडीए कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ किशोर चौगुले यांनी स्वागत केले, आयडीए कोल्हापूरचे सचिव डॉ देवेंद्र खुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. डॉ आशुतोष देशपांडे यांनी मुक्तहास्य स्पर्धेविषयी माहिती दिली. डॉ अव्दैत आफळे, डॉ अजिंक्य पाटील, डॉ सुयोग कुलकर्णी, डॉ अमित शहा, डॉ दिग्विजय पाटील, डॉ अजय कदम, डॉ शैलेश जोशी उपस्थित होते.

…………………………

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes