जिल्हा परिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात, पदाधिकारी - अधिकाऱ्यांची उपस्थिती
schedule02 May 26 person by visibility 63 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा गौरवशाली दिवस म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्र दिन जिल्हा परिषदेत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद परिसरात सकाळपासूनच उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा शशीकांत खोत यांच्या हस्ते ध्वजावंदन करून करण्यात आली. राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना उपस्थितांनी “भारत माता की जय” व “जय महाराष्ट्र” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. ध्वजवंदनानंतर राष्ट्रगीत व जिल्हा परिषद कर्मचारी कलामंचाच्या वतीने राज्यगीत सादर करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा परिषद सदस्य शिवानी भोसले,स्नेहल वेल्हाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयंवत उगले, मुख्य वित्त व लेखाधिकारी अुतल आकुर्डे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मानसिंग पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिपंळे, पशुसंवर्धन अधिकारी प्रमोद बाबर यांच्यासह सर्व खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.