Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महायुतीत कोणी छोटा- मोठा नाही, आम्ही सगळे जुळेभाऊ ! आमच्याकडे ४४०० ठराव, शुक्रवारी प्रचार शुभारंभ ! !महायुतीची गोकुळसाठी महाचर्चा, कोल्हापुरात एकवटले दिग्गज नेते ! जागावाटप संबंधी निर्णय होणार !!अरुण डोंगळेशी खटके, ए वाय पाटलांनी घेतली विनय कोरेंची भेटमहाविकास आघाडीचं ठरलं…शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर ! पदवीधरसाठी डॉ.हर्षदा देशमुख जाधव ?बाजार समितीच्या वार्षिक सभेला सोळा संचालक…५५ सभासद ! सभासदांची नगण्य उपस्थिती चिंताजनक ! ! जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांनी लाटला कोटयवधीचा निधी, काँग्रेसच्या सदस्यांचा पदाधिकाऱ्यांच्यावर हल्लाबोल ! अध्यक्ष- उपाध्यक्ष -सभापती तुपाशी, सदस्य उपाशी!!रोटरी क्लब ऑफ गार्गीजर्फे  यामिनी प्रदर्शनजिप पदाधिकाऱ्यांची कर्मचारी सोसायटीला भेट, कामकाजाचे केले कौतुक ! जिल्हा परिषदेची बुधवारी होणारी सर्वसाधारण सभा रद्दशिक्षक -पदवीधर मतदारसंघाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 23 ऑक्टोबरला मतदान

जाहिरात

 

महाविकास आघाडीचं ठरलं…शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर ! पदवीधरसाठी डॉ.हर्षदा देशमुख जाधव ?

schedule24 Sep 26 person by visibility 739 categoryशैक्षणिक

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन  : पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता उमेदवार कोण हे औत्सुक्यपूर्ण ठरले आहे. महायुतीमध्ये इच्छुकांची गर्दी दिसत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने पुणे विभागीय मतदारसंघातील शिक्षक व पदवीधरसाठी उमेदवार जवळपास निश्चित केले असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे तर  शिक्षक मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाकडे असा फॉर्म्युला ठरला आहे. शिक्षक मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रा. जयंत आसगावकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. तर पदवीधरसाठी राष्ट्रवादी काँग्रेस तरुण चेहरा देणार आहे. माजी विभागीय आयुक्त डॉ. प्रभाकर देशमुख यांची कन्या डॉ. हर्षदा देशमुख जाधव यांना उमेदवार म्हणून पदवीधरच्या मैदानात उतरविण्याचे निश्चित केल्याचे वृत्त आहे. येत्या काही दिवसात या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार आहे.

पुणे शिक्षक व विभागीय मतदारसंघ हा पाच जिल्हयाचा. पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्हयाचा समावेश. सध्या शिक्षक मतदारसंघाातून काँग्रेसचे प्रा. जयंत आसगावकर हे आमदार आहेत. ते दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. २०२० मध्ये त्यांनी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती. काँग्रेसने शिक्षक मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा बनविला होता. विशेषता पक्षाचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी, ‘नेत्यांनी पक्षाकडे जागा घ्यावी, उमेदवार मी निवडून येतो.’अशी जाहीर केले होते. काँग्रेसला जागा मिळाल्यानंतर आमदार पाटील यांनी पुढाकार घेत उमेदवार निश्चितीपासून विजयापर्यंत सारी गणिते जुळवून आणली.

गेली सहा वर्षे आमदार म्हणून काम करताना जयंत आसगावकर यांनी शिक्षकांशी निगडीत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केले. जिल्हा पातळीवरील आंदोलनापासून विभागीय शिक्षण आयुक्तालय, मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला. गेल्या निवडणुकीत त्यांची पाटी कोरी होती. आता सहा वर्षाच्या कालखंडात आमदार म्हणून ते मतदारसंघात परिचित आहेत. त्यांनी मतदारसंघातील शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे. मात्र गेल्या सहा वर्षातील राजकारणही बदलले आहे. त्यावेळी महाविकास आघाडी सत्तेत होती. सत्ता असली की अनेकजण पाठीशी असतात. दरम्यान यंदाच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून पुन्हा एकदा त्यांच्यावर नावावर पसंतीक्रम नोंदविला आहे. त्यांची उमेदवारी निश्चित असून पक्षाकडून अधिकृत घोषणा व्हायचे शिल्लक आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासमोर यंदा आव्हान आहे. गेल्या निवडणुकीतील विजयी आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड आता भाजपमध्ये आहेत. शरद लाड हे भाजपचे संभाव्य उमेदवार आहेत. शिवाय  राष्ट्रवादी पक्षात फुट पडली. मोठा गट महायुतीसोबत आहे. यामुळे यंदा शरद पवार गटाला ही निवडणूक ताकतीने लढवावी लागणार आहे. पवार यांचे निकटवर्तीय माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांची कन्या डॉ. हर्षदा देशमुख जाधव या पदवीधरसाठी तयारी करत आहेत. त्यांच्या उमेदवारीवर महाविकास आघाडीत एकमत झाल्याचे वृत्त आहे. त्या रयत शिक्षण संस्थेच्या सदस्या आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील  के. जे इन्स्ट्यिट्यूटच्या कार्यकारी संचालक आहेत. ही संस्था शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. मावळ प्रांतातील बडे प्रस्थ असलेल्या कल्याण जाधव यांच्या त्या स्नुषा आहेत. पदवीधर निवडणूक लढवायची म्हणून डॉ. हर्षदा देशमुख यांनी तयारी केली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट पासून त्यांनी मतदार नोंदणी केली आहे. रयत शिक्षण संस्थांचे पाठबळ त्यांच्या पाठीशी असेल. शिवाय महाविकास आघाडीच्या नेतेमंडळीच्या ताब्यातील शिक्षण संस्था या जमेच्या बाजू आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes