लिपिकाकडून मुख्याध्यापकांना अपमानास्पद वागणूक
schedule19 Sep 26 person by visibility 69 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनधी -: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक नितीन खाडे यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार शाहूवाडी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल सावेचे प्रभारी मुख्याध्यापक बाबासाहेब कदम यांनी केली आहे. तर लिपिक खाडे यांनी, ‘माझा आवाज मोठा आहे, त्यामुळे तक्रारदारांचा गैरसमज झाला असावा.’असे स्पष्टीकरण दिले. प्रभारी मुख्याध्यापक कदम व त्यांचे सहकारी २१ ऑगस्टला कामासाठी शिक्षण विभागात आले होते.त्यावेळी लिपिक खाडे यांनी, अरेरावी केली, तसेच एकेरी भाषेचा वापर केला असे कदम यांनी म्हटले आहे. ‘तुम्हाला वाचता येते का, का आलायस, सरळ उभा राहा’अशी अपमानास्पद वागणूक दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. प्रभारी मुख्याध्यापक कदम यांनी या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. यासंबंधीचे निवेदन आमदार जयंत आसगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्याकडे केली आहे.