Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या 25 जागेसाठी भाजप उमेदवारी अर्ज दाखल करणार ! निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार !!शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांना पितृशोकडॉ विलास व्ही. कारजिन्नी यांना सीनियर इंजिनिअर ऑनर २०२६ पुरस्कारलिपिकाकडून मुख्याध्यापकांना अपमानास्पद वागणूकराज कोरगावकर, अश्किन आजरेकरचे मुंबईतील स्पर्धेत यशजर्मनीतील प्लांटिक्स कंपनीच्या प्रतिनिधीची बाजार समितीला भेटमृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांना अभिवादनमी मंडळे तोडणारा नव्हे तर जोडणारा कार्यकर्ता –आमदार राजेश क्षीरसागरपाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेची धडक मोहीम; महिन्यात ५३ लाखाची वसुली ! ६५ नळ कनेक्शन बंद; ६ अनधिकृत कनेक्शनला ब्रेक !!आयएसटीई नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्यपदी डॉ.महादेव नरके 

जाहिरात

 

डॉ विलास व्ही. कारजिन्नी यांना सीनियर इंजिनिअर ऑनर २०२६ पुरस्कार

schedule19 Sep 26 person by visibility 22 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : अभियांत्रिकी व शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास व्ही. कारजिन्नी यांची ज्येष्ठ अभियंता ( ‘सीनियर इंजिनिअर’) या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), कोल्हापूर लोकल सेंटर यांच्या वतीने सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातून हा सन्मान देण्यात आला.५९ व्या इंजिनिअर्स डेनिमित्त १५ सप्टेंबर २०२६ रोजी कोल्हापूर येथे हा सन्मान प्रदान करण्यात आला. अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ अनुभवाची आणि योगदानाची दखल घेत हा गौरव करण्यात आला आहे.या गौरवाबद्दल वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी, एन. एच. पाटील, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्राचार्य डॉ. के. ए. पाटील आणि अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे यांनी डॉ. कारजिन्नी यांचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes