शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांना पितृशोक
schedule19 Sep 26 person by visibility 102 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी. शिक्षण आयुक्तालय पुणे येथील कार्यालयातील शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांचे वडील राजाराम महादेव चौगुले यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी (18 सप्टेंबर 2026) निधन झाले. मृत्यूसमयी ते 81 वर्षाचे होते. राजाराम चौगुले यांनी शेतकरी संघामध्ये जवळपास 31 वर्षे सेवा बजावली होती. मॅनेजरपदाची धुरा अतिशय समर्थपणे सांभाळली होती. मुळात शिस्तप्रिय असणारे चौगुले यांनी त्यांच्या नोकरीच्या कार्यकालामध्ये शेतकरी संघासाठी योगदान दिले. चौगुले यांच्या पश्चात त्यांचे जेष्ठ चिरंजीव सुभाष चौगुले, शिवाजी विद्यापीठातील कर्मचारी प्रकाश चौगुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी कागल तालुक्यातील मळगे खुर्द येथे मूळ गावी करण्यात आला.रक्षाविसर्जन विधी रविवार 20 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी नऊ वाजता आहे .