गोकुळच्या 25 जागेसाठी भाजप उमेदवारी अर्ज दाखल करणार ! निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार !!
schedule19 Sep 26 person by visibility 271 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हालचाली गतिमान झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हॉटेल अयोध्या येथे भाजपचे खासदार आमदार व पदाधिकाऱ्यांची शनिवारी (18 सप्टेंबर 2026) बैठक झाली. या बैठकीत गोकुळच्या 25 जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय झाला. सोमवारी सकाळी नऊ वाजता साऱ्यांनी नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयात एकत्र यायचे आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यातयेणारआहेत. दरम्यान महायुती म्हणूनच साऱ्यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला असल्याचे आमदार अमल महाडिक यांनी सांगितले.
गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ळ. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जनसुराज्य शक्ती पक्षच्या उमेदवारानी स्वतंत्रपणे अर्ज दाखल केले आहेत. महायुतीतील साऱ्याच नेत्यांनी गोकुळची निवडणूक महायुती म्हणून आपण सारे एकत्रितपणे लढवणार असल्याचे यापूर्वी स्पष्ट केले आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रत्येक पक्षाने स्वतंत्रपणे प्रक्रिया राबवली. भारतीय जनता पक्षातर्फे सोमवारी 21 सप्टेंबर 2026 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत या साऱ्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी हॉटेल अयोध्या येथे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची व लोकप्रतिनिधींची बैठक झाली या बैठकीत तालुकानिहाय इच्छुक उमेदवारांची यादी तयार करण्यात आली गोकुळच्या एकूण 25 जागेसाठी ही निवडणूक होत आहे. पक्षाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत भाजपतर्फे 25 उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ठरले. खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार संजय घाटगे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष व गोकुळच्या माजी संचालिका शौमिका महाडिक, गडहिंग्लजच्या माजी नराध्यक्ष स्वाती कोरी, प्रा. जयंत पाटील, गोकुळचे माजी संचालक अंबरीश घाटगे, चेतन नरके, विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन पी जी शिंदे , भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, नाथाजी पाटील, डॉ. स्वाती पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक झाली. या बैठकीत तालुका निहाय इच्छुक उमेदवारांची चर्चा झाली. इच्छुक उमेदवारांनी सोमवारी सकाळी नऊ वाजता नागाळा पार्क येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात एकत्र यायचे आणि तेथून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालयाकडे जायचे. असे या बैठकीत ठरले.
दरम्यान महायुतीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जनसुराज्य शक्ती पक्षाळ व भारतीय जनता पक्ष या साऱ्यांनी एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला आहे. भाजपकडून 25 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असले तरी महायुतीच्या जागावाटपासंदर्भात जो अंतिम निर्णय होईल त्या अनुषंगाने उमेदवारी निश्चित केल्या जातील. महायुतीतील जागा वाटपाच्या फार्मूलानुसार भाजपकडे जितक्या जागा येथील तितके उमेदवार रिंगणात असतील आणि ज्यांना उमेदवारी मिळणार नाही ते उमेदवारी अर्ज माघारी घेतील असेही या बैठकीत ठरल्याचे वृत्त आहे. दरम्यान शनिवारी झालेल्या बैठकीत तालुकानिहाय उमेदवारांच्या जागा आणि उमेदवारांची नावे निश्चित करत असताना भाजपच्या दोन लोकप्रतिनिधीमध्ये वाद झाल्याचे चर्चा होती या संदर्भात आमदार अमल महाडिक यांच्याकडे विचारणा केले असता त्यांनी बैठकीत असा कोणताही वाद झाला नाही असे स्पष्ट केले.