Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
छछ डड७८९ दूध संस्था अपात्र, कागल – करवीर -राधानगरीतील संस्थांचा समावेश! दूध संस्था प्रतिनिधीची अधिकाऱ्यांना उद्देशून एकेरी भाषा !!कोल्हापूर शहर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाची कार्यकारिणी जाहीर, शहर अध्यक्षपदी प्रा. अमरसिंह शेळकेदूरशिक्षण -ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे सेट परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळाकुपोषित बालकांना जिल्हा परिषद दत्तक घेणार, महिला व बालकल्याण समितीत निर्णयडीवाय पाटील अभियांत्रिकीला  क्यूएस आय- गेज गोल्ड मानांकनसिद्धगिरीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचा गुरुवारी लोकार्पण सोहळा,  पंकजा मुंडेंची उपस्थितीअन्यायकारक संच मान्यतेच्या विरोधात शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर जोरदार निदर्शनेगुजरीचा गोविंदा दहीहंडी उत्सवात यंदा रशियन कलाकाराचे सादरीकरणशिष्यवृत्तीची रक्कम वाढवणार, वारणेत जागतिक कीर्तीचे तज्ञ आणणार - डॉ. एन. एच. पाटील

जाहिरात

 

सिद्धगिरीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचा गुरुवारी लोकार्पण सोहळा,  पंकजा मुंडेंची उपस्थिती

schedule31 Aug 26 person by visibility 107 categoryसामाजिक

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर: श्री सिद्धगिरी मठ संस्थानतर्फे स्थापन करण्यात आलेल्या खाजगी पशुवैद्यक महाविद्यालयाच्या उद्घाटनाचा लोकार्पण सोहळा आणि भव्य पशुपालक मेळावा येत्या गुरुवारी 3 सप्टेंबर 2026 रोजी कणेरी मठ परिसरात आयोजित करण्यात आला आहे.  मंत्री   पंकजा मुंडे यांच्या  हस्ते आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प पू काडसिद्धेश्वर स्वामी यांनी दिली.  सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रिया महेश शिंदे,  आमदार अमल महाडिक, उत्तर प्रदेशच्या पंडित दीनदयाल उपाध्य पशुचिकित्सा विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू डॉ. कृष्ण मुरारीलाल पाठक, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यक महाविद्यालयाचे संयोगी अधिष्ठाता डॉ. विकास वासकर, गोकुळचे प्रशासकीय सदस्य डॉ. चंद्रकांत परूळेकर, चितळे उद्योग समूहाचे संचालक  विश्वास चितळे आणि जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय कोल्हापूर डॉ. प्रमोद बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत  होणार आहे. 
महाविद्यालयाच्या बोधचिन्हांचे प्रकाशन आणि पशु सर्व चिकित्सालयाच्या उपचार सेवा विस्तारीकरणासाठी गोकुळ दूध संघाशी सामंजस्य करार संपन्न होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. मुरुगप्पा यांनी दिली. तसेच कृषी विज्ञान केंद्रातर्फे पशुपालक मेळाव्यासाठी उपस्थित होणाऱ्या दूध उत्पादकांना देशी गोवंश प्रदर्शन आणि गोवंश चलीत कृषी यंत्रांचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले असल्याचे प्राचार्य डॉ. रवींद्र सिंग यांनी कळवले आहे. या संस्थांनचे कार्यकारी संचालक डॉ. यशोवर्धन बारामतीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जी पी वड्ड,  विक्रम पाटील व श्री प्रल्हाद जाधव यांच्यासह संस्थांच्या सर्व संचालक मंडळाकडून आणि नियोजनाची तयारी सुरू आहे.

या निमित्याने श्री सिद्धगिरी पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालय विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, चितळे डेअरी चे संचालक गिरीश चितळे यांच्या मार्गदर्शनात  पशुपालक मेळावा आयोजित करण्यात आला असून समृद्ध पशुपालन आणि सक्षम दूध व्यवसायासाठी डॉ. सुनील राऊतमारे, डॉ. नितीन मार्कंडेय, डॉ. अंकुश परिहार, डॉ. प्रशांत योगी, डॉ. दिनेश टाकळीकर, डॉ. विनोद पाटील, पांडुरंग काळे, डॉ. पुष्पनाथ चौगुले, डॉ. कैवल्य देशमुख, डॉ. राऊ भांगे  मार्गदर्शन होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes