Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
छछ डड७८९ दूध संस्था अपात्र, कागल – करवीर -राधानगरीतील संस्थांचा समावेश! दूध संस्था प्रतिनिधीची अधिकाऱ्यांना उद्देशून एकेरी भाषा !!कोल्हापूर शहर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाची कार्यकारिणी जाहीर, शहर अध्यक्षपदी प्रा. अमरसिंह शेळकेदूरशिक्षण -ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे सेट परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळाकुपोषित बालकांना जिल्हा परिषद दत्तक घेणार, महिला व बालकल्याण समितीत निर्णयडीवाय पाटील अभियांत्रिकीला  क्यूएस आय- गेज गोल्ड मानांकनसिद्धगिरीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचा गुरुवारी लोकार्पण सोहळा,  पंकजा मुंडेंची उपस्थितीअन्यायकारक संच मान्यतेच्या विरोधात शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर जोरदार निदर्शनेगुजरीचा गोविंदा दहीहंडी उत्सवात यंदा रशियन कलाकाराचे सादरीकरणशिष्यवृत्तीची रक्कम वाढवणार, वारणेत जागतिक कीर्तीचे तज्ञ आणणार - डॉ. एन. एच. पाटील

जाहिरात

 

कुपोषित बालकांना जिल्हा परिषद दत्तक घेणार, महिला व बालकल्याण समितीत निर्णय

schedule31 Aug 26 person by visibility 145 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी एक महत्त्वपूर्ण व अभिनव उपक्रम हाती घेण्याचा निर्णय झाला. सर्व जिल्हा परिषद सदस्य आपापल्या मतदारसंघातील कुपोषित बालकांना दत्तक घेऊन त्यांना कुपोषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. महिला  व बालकल्याण समिती सभापती विद्या विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

 जिल्हा परिषद कोल्हापूर येथील स्वर्गीय वसंतराव नाईक समिती सभागृहात महिला व बाल कल्याण समितीची सभा सभापती विद्या विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विभागीय पुरस्कार' पात्र ठरलेल्या 'स्वयंप्रेरिका ग्रामीण महिला संस्था' (पोर्ले तर्फे बोरगाव) आणि 'भगवानबाबा शिक्षण प्रसारक संस्था' (इचलकरंजी) या संस्थांचे अभिनंदन करण्यात आले.

सभापती पाटील यांनी अंगणवाड्यांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. ज्या अंगणवाड्यांमध्ये सोलर पॅनेल नादुरुस्त आहेत, तेथे ग्रामपंचायतींच्या माध्यमातून तात्काळ वीज जोडणी (लाइट कनेक्शन) करण्याची सूचना केली. तसेच, बालकांच्या आरोग्याच्या अचूक नोंदीसाठी नादुरुस्त वजनकाटे बदलून नवीन काटे देणे आणि बंद असलेले डिजिटल लर्निंग टीव्ही बदलून नवीन टीव्ही उपलब्ध करून दयावेत. यासोबतच, करवीर पंचायत समिती येथे महिलांसाठी नवीन समुपदेशन केंद्र सुरू करण्यासाठी राज्य महिला आयोगाकडे शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकी दरम्यान सदस्या  वर्षाराणी पाटील यांनी उपस्थितांना 'नशामुक्तीची शपथ' दिली. सदस्या सोनाली पाटील यांनी आभार मानले. या बैठकीस समिती सदस्या शैलजा पाटील, रोहिणी आबिटकर, संयोगिता मोरे,  विनिता भोगम, गडहिंग्लज पंचायत समिती सभापती प्रतिभा चव्हाण, जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मस्के, कक्ष अधिकारी संजय जाधव, अधीक्षक नारायण चांदेकर, विस्तार अधिकारी प्रशांत पाटील, सौरभ कांबळे  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes