Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिकेत आता प्रभाग समिती सभापतिपदासाठी धुमशानसर्किट बेंचमध्ये गोकुळविषयी पुढील सुनावणी २७ -२८ एप्रिलला, दुग्ध विभागाकडे दूध संस्थांच्या सुनावणी शिवाजी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दिपक काशीद, उपाध्यक्षपदी राकेश डोंगरेशिक्षण सेवकांना सानुग्रह अनुदानबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठविणार- शिक्षण संचालक शरद गोसावीपटपडताळणीस शैक्षणिक व्यासपीठ - मुख्याध्यापक संघाचा तीव्र विरोधब्राह्मण महासंघाच्यावतीने रविवारी ब्राह्मण शेतकरी मेळावासमरजितसिंह घाटगेंची भाजपमध्ये पुन्हा वापसी !- आता कुठलेही प्रयोग करायचे नाहीत, जे पक्ष सांगेल ते काम करणार! ! कोल्हापूरसाठी बेस्ट सेवासुविधा देण्याला प्राधान्य - आयुक्त राजेंद्र भारुडसामान्य कुटुंबातील पोरीने एमपीएससीतून एकावेळी दोन पोस्ट मिळवल्या ! सेंट्रिग काम करणारा बाप, शेतमजूर आईचे फेडले पांग !!ङङक्षथछ तत

जाहिरात

 

भुदरगड- चंदगड तालुक्यांपुढे स्वित्झर्लंड देशही फिका, पर्यटनस्थळे विकसित करण्याची गरज

schedule05 Apr 26 person by visibility 60 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूर जिल्ह्यातील भूदरगड, चंदगड यासारखे तालुक्यांपुढे स्वित्झर्लंड देशही फिफा पडेल. मात्र, आपल्याकडील बराच तरुणवर्ग पोटापाण्यासाठी मुंबईसारख्या महानगराकडे धावतोय. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील २७०० गावांतील घरात वास्तव्याला नसल्याचे समोर आले आहे, ही चिंताजनक बाब आहे. याचबरोबर लोकप्रतिनिधींनी आपआपल्या मतदारसंघात पर्यटनस्थळे विकसित करुन पर्यटनाला चालना देण्याची गरज आहे.’ असे मत काडसिध्देश्वर स्वामी यांनी व्यक्त केले.

कणेरी मठावर आयोजित केलेल्या कारागिरी महाकुंभ उपक्रमाच्या सांगता समारोपावेळी ते बोलत होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार राहूल आवाडे, शाहू ग्रुपचे प्रमुख समरजित घाटगे, गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती. 

मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, कणेरी मठावर अलिकडच्या काळात भारतीय संस्कृतीचे जतन किंवा जोपासना करण्याच्यादृष्टीने विविध उपक्रम, नाविण्यपूर्ण प्रदर्शन भरवून एक चांगला संदेश देशात जात आहे. त्यामुळे येथे भेट देवून जाणाऱ्या अनेक लोकांच्या जीवनात आनंद आणि उर्जा निर्माण होत आहे. हे लक्षात घेतले तर कणेरी मठावर समाजाला, मनुष्य जातीला आवश्यक असणाऱ्या विविध गोष्टींचे विद्यापीठ व्हावे, अशीही अपेक्षा पालकमंत्री आबिटकर यांनी व्यक्त केली.
   
   खासदार धनंजय महाडिक म्हणाले, २०१४ पूर्वी देशात ३५० स्टार्टअप होते. आज ४ लाख स्टार्टअप आहेत. काडसिध्देश्वर स्वामी यांना मी महाराज असे न संबोधता मी शास्त्त्रज्ञ असे म्हणतो. कारण ते वारंवार नवनवीन प्रयोग करतात. कारागीर महाकुंभांचा मेळावा भरवता येवू शकतो, हा विचार कोणाच्याही मनाला शिवणार नाही. मात्र, या ठिकाणी हे शक्य झाले आहे. या कारागीर महाकुंभाच्या माध्यमातून हजारो जण प्रेरणा घेवून जाणार आहेत. कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, जालंदर पाटील, यशवर्धन बारामतीकर, जे. पी. वड्ड, डॉ. वर्षा पाटील, रविंद्र लाड, बसंतकुमार सिंग खादी ग्रामोद्योग संयोजक , विवेक सिद्ध, विक्रम पाटील, विजय सरगर, प्रल्हाद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यशोवर्धन बारामतीकर यांनी प्रास्ताविक केले. विवेक सिध्द यांनी सूत्रसंचालन केले. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes