Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
संस्थेच्या नावांनी बनावट नियुक्ती आदेश, पाच जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखलविवेकानंद कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. मिलिंद हुजरेराज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून कोरे डिप्लोमाला अतिशय उत्कृष्ट मानांकनगोकुळ जपू या - गोकुळ वाढवू या, डॉ. युवराज येंडुरेंच्या नेतृत्वाखालील आत्मक्लेश आंदोलनात शेतकरीही सहभागी  जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी बाजीराव पाटीलकोल्हापूर - सांगलीसह चार जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांची विशेष तपासणी; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईआषाढी वारीसाठी जिल्हा परिषदेचे वैद्यकीय मदत पथक सज्ज, औषध किटसह पथक आळंदीसाठी रवाना!शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्राम, विद्यार्थिनींच्या कलागुणांना लाभले व्यासपीठमहाराष्ट्र चेंबरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा दिमाखात, मुख्यमंत्र्यांनी केले गाव तिथे उद्योजक उपक्रमाचे कौतुक श्री आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये इंजिनिअरिंग प्रवेशासाठी मोफत सुविधा केंद्र

जाहिरात

 

करवीर पंचायत समितीतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देणार - साताप्पा पाटील

schedule08 Jul 26 person by visibility 27 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापर : करवीर पंचायत समितीर्फे तालुक्यातील उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांना ‘करवीर श्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ देण्यात येतील’अशी घोषणा पंचायत समिती सभापती साताप्पा पाटील यांनी केली. करवीर तालुका शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सभा झाली. नगरसेवक राहुल माने यांची उपस्थिती होती. शिक्षक नेते राजाराम वरुटे हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी वरुटे यांनी पतसंस्थेच्या कामगिरीचा गौरवोल्लेख केला. ‘संस्थेच्या प्रारंभापासूनच ऑडिट वर्ग अ मिळाला आहे. एनपीए शून्य टक्के आहे.संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय एकशिंगे यांनी स्वागत केले. सचिव अमोल लगारे यांनी अहवाल वाचन केले. उपाध्यक्षा नूरजहा मुल्लाणी यांनी आभार मानले. याप्रसंगी उपसभापती दीपाली पाटील, प्रकाश आंग्रे, संस्थापक शामराव जाधव, श्रीकांत चव्हाण, अशोक संकपाळ, श्वेता खांडेकर, प्रशांत पोतदार, संभाजी पाटील, बाजीराव पाटील, मारुती दिंडे, प्रकाश निकम, विजय मालाधारी, संतोष कांदळकर, धोंडीराम पाटील, ज्योत्स्ना महात्मे, नीता ठाणेकर, वर्षा सनगर, अजित कुभार, बाजीराव कांबळे, बाजीराव लगारे आदी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes