पदवीधर मतदारांच्या जागृतीसाठी पदवीधर संघटना मैदानात ! प्राध्यापक - शिक्षकांचा पुढाकार !!
schedule26 Feb 26 person by visibility 66 categoryशैक्षणिक
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : उच्च शिक्षण क्षेत्राशी निगडीत विषय, पदवीधरांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी पदवीधर मतदारसंघातून आमदार निवडला जातो. मात्र अनेकदा राजकीय पक्ष आपल्या सोयीनुसार या मतदारसंघाचे राजकारण करतात. पदवीधर मतदार नोंदणी असो की उमेदवार निवड सारे काही राजकीय पक्ष व नेते मंडळींच्या मर्जीनुसार. यामुळे निवडलेला आमदार हा पदवीधरांचे प्रश्न मांडण्याऐवजी राजकीय पक्षांची भूमिका घेऊन कामकाज करत असल्याचे चित्र आहे. नेमके हे चित्र बदलण्यासाठी, पदवीधर मतदारसंघासाठी जास्तीत जास्त मतदार नोंदणी व्हावी, राजकीय कार्यकर्ता नव्हे तर पदवीधरच आमदार बनावा यासाठी पुण झोनल पदवीधर संघटनेची स्थापना झाली आहे.यामध्ये शिक्षण क्षेत्राविषयी आस्था असणाऱ्या मंडळींचा पुढाकार आहे. पाचही जिल्ह्यात संघटना काम करणार आहे.
या संघटनेत कोण प्राध्यापक आहेत, कोण शिक्षक आहेत. कोण अन्य क्षेत्रातील आहेत. तर काही मंडळी सरकारी सेवेतून निवृत्त झाली आहेत.पहिल्यांदा पुणे झोन अंतर्गत ही पदवीधर संघटना काम करत आहे. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे अशा पाचही जिल्ह्यात पदवीधर संघटना पदवीधर तरुण-तरुणींमध्ये जाणीव जागृती करणार आहे. पुणे झोन अंतर्गत कोल्हापूर जिल्हा पदवीधर संघटना काम करत आहे. या संघटनेची कार्यकारिणी स्थापन केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी समन्वयकाची नेमणूक केली आहे. तसेच कोल्हापूर शहर समन्यवक नेमले आहेत.
कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रा. गजानन भोसले (कोल्हापूर शहर), अंकुश चव्हाण (भुदरगड-गारगोटी), तुकाराम गडकरी (माद्याळ/कागल), प्राल. विलासराव पाटील (कागल), डॉ. अरविंद पठाणे (चंदगड), अनिल चव्हाण (कोल्हापूर), विनायक रेडेकर (पन्हाळा, वारणानगर, कोडोली), रणजीत कालेकर (आजरा-गडहिंग्लज तालुका), ऋषिकेश चव्हाण (येवती, तुरुंबे, कावणे, म्हाळुंगे), समित कांबळे (जयसिंगपूर-इचलकरंजी), नंदकुमार माने (कसबा बावडा), प्रा. प्रगती खेर (शिये, हातकणंगले-शिरोळ ), स्वप्निल सुजल (शेणगाव - कागल-गारगोटी-राधानगरी), अनंत पाटील (वारंग पाडळी करवीर), प्रिती महाडेश्वर (कोल्हापूर शहर), माधुरी हळबे (पाचगाव, कोल्हापूर), प्रा सुरेश देसाई (पुष्पनगर, गारगोटी) आप्पासाहेब घाटगे, जे. डी. कांबळे, दिपक लक्ष्मण शेळके, तुकाराम गडकरी यांचा समावेश आहे.
……………………..
“ आज पदवीधारकांसमोर विविध प्रश्ने आ वासून उभी आहेत. उच्च शिक्षण क्षेत्र बदलत आहे. बहुतांश वेळेला पदवीधारकांचा उपयोग केवळ राजकारणासाठी होतो. त्यांचे प्रश्न, त्यांच्या आशा आकांक्षा बाजूला पडतात. नेमक्या याच बाबींचा विचार करुन पदवीधर संघटना पदवीधारकांसाठी जागृती मोहिम राबविणार आहे. त्यांच्या प्रश्नांसंबंधी विचार विनिमय करुन सोडवणुकीसाठी नियोजन केले जाईल. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर या पाचही जिल्ह्यात पदवीधर संघटना जाणीव जागृतीचे काम करणार आहे.”
- प्रा. गजानन भोसले (कोल्हापूर शहर)