Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी एस. व्ही. पाटील, उपाध्यक्षपदी गजानन कांबळे डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या स्वप्नील अलंगे यांची बीआयएसएजी-एनमध्ये निवडकोल्हापुरात महिलांच्यासाठी सर्व सुविधायुक्त वातानुकूलित स्वच्छतागृहे ! रविवारी होणार लोकार्पण !! खडके अकॅडमी बोरपाडळेचा दहावीचा सलग अकराव्या वर्षी शंभर टक्के निकालआबिटकर इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्केनूतन मराठी विद्यालयचा दहावीचा निकाल ८१ टक्केप्रकाश बेलवाडेंवर हल्ल्याचा प्रयत्न, एक जण जखमीकोल्हापूर विभाग राज्यात द्वितीय ! तीन जिल्ह्यातील ९२८ शाळांचा निकाल शंभर टक्के ! !अशोक गाडे, दुग्धचे उपनिबंधक राजकुमार पाटील यांच्यावर कारवाईची मागणीयंग सिनीअर्सची रंग-रेषांची दुनिया ! शाहू स्मारक भवनमध्ये चित्र प्रदर्शन !!

जाहिरात

 

कोल्हापुरात महिलांच्यासाठी सर्व सुविधायुक्त वातानुकूलित स्वच्छतागृहे ! रविवारी होणार लोकार्पण !!

schedule08 May 26 person by visibility 168 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापुरात महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याच्या मागणीला आता मुर्त स्वरुप आले आहे. महिला भाविक, पर्यटकांसह कोल्हापुरातील महिलांसाठी आता वातानुकूलित  स्वच्छतागृह उपलब्ध झाले आहे. शहरातील खासबाग मैदान,  आणि ताराबाई पार्क इथं ही महिला स्वच्छतागृह उभारली आहेत. त्यांचा लोकार्पण रविवार १० मे रोजी होणार आहे. या कामाची पाहणी आज भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी केली.

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी तसेच पन्हाळा ज्योतिबा दर्शन आणि पर्यटनासाठी दररोज हजारो भाविक कोल्हापुरात येत असतात. महिला भाविकांसाठी कोल्हापुरात सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत. त्यामुळे वारंवार कोल्हापूरची नाचक्की होत होती. दरम्यान कोल्हापुर महापालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर महिला स्वच्छतागृहांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. २५ वर्षाची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशानं स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकाच्या माध्यमातून भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष  महाडिक यांनी पाठपुरावा केल्यानंतर तात्काळ राज्य सरकारकडून निधी उपलब्ध झाला. या माध्यमातून कोल्हापूर शहरातील खासबाग मैदान चौक, आणि ताराबाई पार्क इथल्या एसटी कार्यशाळेबाहेरील जागेत महिलांसाठी स्वच्छतागृह उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला. दोन महिन्यात ही स्वच्छतागृहं बांधून तयार झाली असून, महिलांसाठी सर्व सुविधांयुक्त अशी ही स्वच्छतागृहे आहेत. या स्वच्छतागृहांचे लोकार्पण रविवारी पालकमंंत्री प्रकाश आबिटकर, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, महापौर रूपाराणी निकम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्यासह जिल्हयातील आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार आहे. दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष महाडिक यांच्यासह मान्यवरांनी आज या स्वच्छतागृहांची पाहणी केली. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता खासबाग मैदान आणि ताराबाई पार्कातील आरटीओ कार्यालयाजवळ सकाळी साडेदहा वाजता स्वच्छतागृहाचं लोकार्पण होणार आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes