Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
संस्थेच्या नावांनी बनावट नियुक्ती आदेश, पाच जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखलविवेकानंद कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. मिलिंद हुजरेराज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून कोरे डिप्लोमाला अतिशय उत्कृष्ट मानांकनगोकुळ जपू या - गोकुळ वाढवू या, डॉ. युवराज येंडुरेंच्या नेतृत्वाखालील आत्मक्लेश आंदोलनात शेतकरीही सहभागी  जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी बाजीराव पाटीलकोल्हापूर - सांगलीसह चार जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांची विशेष तपासणी; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईआषाढी वारीसाठी जिल्हा परिषदेचे वैद्यकीय मदत पथक सज्ज, औषध किटसह पथक आळंदीसाठी रवाना!शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्राम, विद्यार्थिनींच्या कलागुणांना लाभले व्यासपीठमहाराष्ट्र चेंबरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा दिमाखात, मुख्यमंत्र्यांनी केले गाव तिथे उद्योजक उपक्रमाचे कौतुक श्री आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये इंजिनिअरिंग प्रवेशासाठी मोफत सुविधा केंद्र

जाहिरात

 

कौशल्य विकासासाठी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन-  शिवाजी विद्यापीठात लवकरच सामज्यंस करार -कुलगुरू डॉ.राजनीश कामत

schedule07 Jul 26 person by visibility 71 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : .  ‘उद्योगक्षेत्राला नवनिर्मितीची अत्यंत आवश्यकता असून जागतिक स्थरावर गुणवत्ता मानांकने काय आहेत  याचा सातत्याने अभ्यास केला पाहिजे आणि यासाठी कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशन आणि शिवाजी विद्यापीठ यांनी एकत्रपणे काम करूबाजारपेठेची गरज ओळखण्यासाठी मार्केंटिंग स्किल वाढविण्यासाठी आपण भर देवूअसोसिएशन कौशल्य विकास केंद्र सुरू करणार आहे ते शिवाजी विद्यापीठाशी संलग्न करू आणि त्याला अक्रिडेशन करून देवू. ग्रीन ईकॉनामिसाठीही सर्वांनी एकत्र बसून  रूपरेषा ठरवूअशी ग्वाही शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी दिली.

कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनने ७९ वर्षाचा गौरवशील प्रवास पूर्ण करत ८० व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात कुलगुरू कामत बोलत होते. याप्रसंगी डॉ.कामत यांचा शाल,श्रीफळ,स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देवून असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आलाअसोसिएशनचे नवीन अकरा आजीव सभासद झालेबद्दल त्यांचा कुलगुरूंच्या हस्ते सर्टीफिकेट देवून सत्कार करण्यात आला.  कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेंद्र जैन यांची प्रमुख उस्थिती होती.

कामत यांनी, ‘राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण उद्योग हे एकमेकांपासून वेगळे राहू शकत नाहीत हे ओळखून दूरदृष्टीने या उद्यमनगरीची स्थापना केलीया संस्थेला गौरवशाली इतिहास, समृद्ध परंपरा, समाजातील विश्वासार्ह स्थान आणि अनेक वर्षांची उल्लेखनीय औद्योगिक कामगिरी लाभलेली आहे।असे गौरवोद्गगार काढले.’ असोसिएशनचे  अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी,‘ कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, इंडस्ट्री 4.0 आणि हरित तंत्रज्ञानाच्या युगात उद्योग शिक्षण संस्थांमधील समन्वय अधिक बळकट करण्याची गरज आहे. भविष्यात कौशल्य विकास, नवोन्मेष, स्टार्टअप्स, अप्रेंटिसशिप, संशोधन सहकार्य आणि उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी असोसिएशन अधिक प्रभावी बजावेल.असे नमूद केले.

असोसिएशनचे उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.   ऑनररी सेक्रेटरी नितीन वाडीकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रसन्न तेरदाळकर, संजय अंगडी,बाबासो कोंडेकर, अतुल आरवाडे, हर्षद दलाल, अमर करांडे, जयदिप मांगोरे, स्मॅकचे अध्यक्ष जयदीप मांगारे, कोल्हापूर उद्यम सोसायटीचे अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय थोरवत, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, विठ्ठल पाटील,हरिशचंद्र धोत्रे, औद्योगिक सुरक्षा आरोग्य संचलनालयाचे सहसंचालक अभिजित अवसरे, संजय पेंडसे, शामसंदर तोतला, शाम देशिंगकर, नलिनी नेने, हिंदूराव कामते, अनिल कुडचे, चंद्रकांत चोरगे, प्रदीप कापडिया, सुरेश मंडलिक, शैलेश पुरोहीत, आनंद माने, देवेंद्र ओबेरॉय,अमित करजगार, किरण चरणे, अमोल गणपुले,विनय सांगले, केदार हसबनीस, विश्वजीत सावंत, प्रकाश तेंडूलकर, नंदकुमार नलवडे,अमित माटे, शांताराम सुर्वे, पद्मसिंह पाटील,अजित कोठारी, ,निलेश कदम, ज्ञानोबा कोंढाळकर, सुरज देशपांडे,सचिन रासकर, प्रशांत मोरे, प्रवीण कोठावळे, राम कुंभार, भगवान माने  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes