Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
एक पाऊल प्रगतीकडे, अध्यक्षांचा दौरा तालुक्याकडे !  विकासकामांचा, प्रशासकीय यंत्रणेचा घेणार आढावा  !! ङङक्षथथ थछ३१ मेपर्यंत थकबाकी भरा, अन्यथा एक जूनपासून दुकानगाळे सील - आयुक्‍त राजेंद्र भारुड कुलगुरुपदासाठी चौदा मे रोजी अंतिम मुलाखती ! डॉ. पी. एस. पाटील, आर. के. कामत, ज्योती जाधव यांचा समावेश !!आनंदोत्सव शिक्षण विभागाने देशात अव्वल स्थान पटकाविल्याचा…संकल्प उत्कर्ष श्रेणी प्राप्तीचाभारतीय जनरल कामगार सेनेतर्फे निदर्शने, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरदमसाचे पुरस्कार जाहीर, 24 मे रोजी पुरस्कार वितरण समारंभ शाहू महाराज हायस्कूलचा दहावीचा निकाल ९७.९८ टक्केफुटबॉलपटूनी चषक जिंकला… अॅक्टिव्हा बक्षीस देऊन होणार गौरवम्युझिकल फाऊटेंनच्या कामात कोणतीही तडजोड नको : आमदार राजेश क्षीरसागर

जाहिरात

 

कुलगुरुपदासाठी चौदा मे रोजी अंतिम मुलाखती ! डॉ. पी. एस. पाटील, आर. के. कामत, ज्योती जाधव यांचा समावेश !!

schedule11 May 26 person by visibility 702 categoryशैक्षणिक

महराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी अंतिम मुलाखती चौदा मे २०२६ रोजी होणार आहेत. कुलपती कार्यालयाकडून यासंदर्भात पाच जणांना मेल प्राप्त झाले आहेत. अंतिम मुलाखतीसाठी शिवाजी विद्यापीठाचे  माजी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत, शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, यांची निवड झाली आहेत. याशिवाय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील डॉ. संजय ढोले, नागपूर येथील डॉ. स्मिता देशमुख आणि नांदेड येथील डॉ.ए. एम. महाजन यांचा अंतिम पाच मध्ये समावेश असल्याचे वृत्त आहे.  देशमुख व महाजन यांच्याशी  संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

तत्कालिन कुलगुरू डी. टी. शिर्के शिर्के यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाल सहा ऑक्टोबर २०२५ रोजी संपला. सध्या विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे तर प्रकुलगुरुपदी डॉ. ज्योती जाधव आहेत. दरम्यान कुलगुरू शोध समितीने कुलगुरुपदासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. २३ डिसेंबर २०२५ ते २७ जानेवारी २०२६ या अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत ११५ जणांनी अर्ज दाखल केले. फेब्रुवारी महिन्यात त्या अर्जांची छाननी झाली. त्यातून समितीने २८ उमेदवारांची नावे मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केली आहेत.

कुलगुरुपदासाठी शॉर्टलिस्ट झालेल्या २८ उमेदवारांमध्ये मुंबईतील डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत, शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, माजी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, एसएनडीटी विद्यापीठाचे कुलसचिव विलास नांदवडेकर रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. एस. चव्हाण, पदार्थ विज्ञान विभागप्रमुख डॉ. आर. जी. सोनकवडे, वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. एस. एस. कोळेकर, यांचा समावेश आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. संजय ढोले, डॉ. संजय चाकणे, दिल्ली विद्यापीठातील डॉ. विलास खरात, डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. सतीश पाटील, डॉ. ए. एम. महाजन, डॉ. नितीन देसाई, डॉ. विजय खरे, डॉ. स्मिता देशमुख, डॉ. राजेश गच्चे, श्रीमती डॉ. बेलनकर,प्रा. डॉ. जोगी, एनआयटीमधील राजेंद्र काकडे यांचा समावेश होता. या साऱ्यांच्या मुलाखती तीन व चार एप्रिल २०२६ रोजी झाल्या होत्या. कुलगुरू शोध समितीने त्यांच्या मुलाखती घेऊन कुलपती कार्यालयाकडे माहिती सादर केली होती. आता कुलपी कार्यालयाकडून पाच जणांना कुलगुरुपदाच्या अंतिम मुलाखतीसाठी बोलावले आहे. डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत, शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, माजी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील हे तिघे शिवाजी विद्यापीठाशी निगडीत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes