Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मान्यवरांशी संवाद, भेटीगाठीद्वारे कौस्तुभ गावडेंचा प्रचारावर भरमहायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीची घोषणा, नेते अन उमेदवारांच्या उपस्थितीत घोषणासमविचारी आघाडीतर्फे उमेदवारांची घोषणा, सात संचालकाना पुन्हा उमेदवारीगोकुळसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर, तीन माजी चेअरमन, बारा संचालकांना उमेदवारी  पदवीधरांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करणार हर्षदा देशमुख -जाधवराधानगरीत राष्ट्रवादीत फूट, प्रा. किसन चौगले  काँग्रेसकडे ! समविचारी आघाडीतून उमेदवारी ! !नाना आगळा - नाना वेगळा…नाना जीवाभावाचा !!मुश्रीफसाहेब मला खाणार आहेत की ? मी त्यांना खाणार आहे ? आमदार शिवाजी पाटलांचे धडाकेबाज विधानमहायुतीच्या उमेदवारांची यादी गुरुवारी दहा वाजता जाहीर होणार, मंत्री मुश्रीफ करणार नावांचे ट्विटगोकुळसाठी महायुतीच्या घडामोडी वेगावल्या, तीन मंत्री -खासदार- आमदारांची उपस्थिती ! आमदार शिवाजी पाटील ही बैठकीला!!

जाहिरात

 

गोकुळसाठी महायुतीच्या घडामोडी वेगावल्या, तीन मंत्री -खासदार- आमदारांची उपस्थिती ! आमदार शिवाजी पाटील ही बैठकीला!!

schedule07 Oct 26 person by visibility 268 category

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी महायुतीमध्ये घडामोडी वेगळ्या आहेत. हॉटेल पॅव्हेलियन येथे महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील हे सुद्धा या बैठकीला उपस्थित राहिले आहेत. महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ही निश्चित झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आठ आणि यड्रावकर गटाला एक असे एकूण नऊ जागा  आहेत. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला प्रत्येकी सात जागा, जनसुराज्य शक्ती पक्षाला दोन जागा अशी विभागणी करण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला दहा जागा हव्या आहेत.
गोकुळ दूध संघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आठ ऑक्टोबर 2026 पर्यंत आहे. 8 ऑक्टोंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी व चिन्हांचे वाटप होणार आहे .त्यामुळे उमेदवार निश्चिती करण्यासाठी महायुतीमध्ये दिवसभर घडामोडी सुरू होत्या. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी पहिल्यांदा स्वतंत्र बैठका झाल्या. सायंकाळी हॉटेल  पॅवेलियन येथे महायुतीमधील सगळ्या नेते मंडळींची बैठक सुरू झाली. मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर,  खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक माजी आमदार के पी पाटील, समित कदम हे या बैठकीला उपस्थित राहिले आहेत. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांचे हॉटेल पॅव्हेलियन येथे आगमन झाले. ते ही बैठकीत सामील झाले. कोणत्या पक्षाला किती जागा, कोण कोणत्या संवर्गातून लढणार यासंदर्भात चर्चा सुरू आहे

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes