Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मान्यवरांशी संवाद, भेटीगाठीद्वारे कौस्तुभ गावडेंचा प्रचारावर भरमहायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीची घोषणा, नेते अन उमेदवारांच्या उपस्थितीत घोषणासमविचारी आघाडीतर्फे उमेदवारांची घोषणा, सात संचालकाना पुन्हा उमेदवारीगोकुळसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर, तीन माजी चेअरमन, बारा संचालकांना उमेदवारी  पदवीधरांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करणार हर्षदा देशमुख -जाधवराधानगरीत राष्ट्रवादीत फूट, प्रा. किसन चौगले  काँग्रेसकडे ! समविचारी आघाडीतून उमेदवारी ! !नाना आगळा - नाना वेगळा…नाना जीवाभावाचा !!मुश्रीफसाहेब मला खाणार आहेत की ? मी त्यांना खाणार आहे ? आमदार शिवाजी पाटलांचे धडाकेबाज विधानमहायुतीच्या उमेदवारांची यादी गुरुवारी दहा वाजता जाहीर होणार, मंत्री मुश्रीफ करणार नावांचे ट्विटगोकुळसाठी महायुतीच्या घडामोडी वेगावल्या, तीन मंत्री -खासदार- आमदारांची उपस्थिती ! आमदार शिवाजी पाटील ही बैठकीला!!

जाहिरात

 

कोल्हापुरात भाजपातर्फे ज्योती यात्रा उत्साहात, शहरातून मोटरसायकल रॅली

schedule07 Oct 26 person by visibility 77 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशसेवेला दिलेल्या २५ वर्षांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, कोल्हापूरच्या वतीने ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात  झाली. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यात्रेला उत्साहपूर्ण वातावरण लाभले. मोटर सायकल रॅली काढण्यात आली.

दसरा चौक येथून ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषात मोटारसायकल रॅलीला सुरुवात झाली. व्हिनस कॉर्नर, असेंब्ली रोड, महावीर गार्डन, खानविलकर पेट्रोल पंप मार्गे ही यात्रा भाजपा जिल्हा कार्यालय, नागाळा पार्क येथे पोहोचली.

भाजपा जिल्हा कार्यालयाच्या प्रांगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या लोकसेवेवर आधारित आकर्षक ‘सेवा ज्योती’ रांगोळी साकारण्यात आली होती. वंदे मातरम् आणि महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनानंतर उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाईव्ह संबोधन मोठ्या स्क्रीनवर ऐकले.

भाजपा जिल्हाध्यक्ष नगरसेवक विजय  यांनी  स्वागत केले. खासदार धनंजय महाडिक व आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.  आगामी पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक वेळ देऊन मतदारांशी संपर्क वाढविण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अजिंक्य रेडेकर (छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेता), वैष्णवी पवार (राष्ट्रीय खो-खो सुवर्णपदक विजेती) आणि वृंदा भुतडा (राष्ट्रीय योग सुवर्णपदक विजेती) यांचा  सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार राहुल आवाडे, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राजवर्धन निंबाळकर, नाथाजी पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, महेश जाधव, राहुल चिकोडे, विराज चिखलीकर, हेमंत आराध्ये, अमर साठे, माधुरी नकाते, अनिल डाळ्या, सतीश पंडित, आनंद गुरव, सुशीला पाटील, शाहजी भोसले,  स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, नगरसेवक विजयसिंह खाडे, विजयसिंह देसाई, सुनील वाडकर, निलिमा शैलेश पाटील, पल्लवी देसाई, दीपा काटकर, अर्चना कोराणे, पूर्वा राणे, माधुरी व्हटकर, रेखा उगवे, मामा कोळवणकर, दिलीप मेत्रानी, दिलीप बोंद्रे मंगला निपाणीकर, निलेश देसाई, विजय आगरवाल, शिवाजी बुवा उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes