श्री महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप
schedule08 Jul 26 person by visibility 30 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्यावतीने महापालिका शाळेतील दीड हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अन्नछत्राचे संस्थापक राजू मेवेकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजेंद्रनगर येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर येथे हा उपक्रम झाला. महापौर रुपाराणी निकम, चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक प्रशांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. विराज कुलकर्णी, प्रतीक गुरव यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. दरम्यान बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर विद्यामंदिर, आमदार पी. बी. साळुंखे कनया विद्यामंदिर, दत्ताजीराव माने विद्यालय, महाराणी ताराबाई विद्यालय, महाराणा प्रताप हायस्कूल, शिवराज विद्यालय, अहिल्याबाई सेंट्रल प्रायमरी स्कूल, द्वारकानाथ कपूर विद्यालय, संत रोहिदास विद्यामंदिर, शेठ रामनारायण रुईया विद्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर, रावबहाद्दूर विचारे विद्यालय येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.