Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कर्मचारी पतसंस्थेतर्फे गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफांचा सत्कारकोरगांवकर हायस्कूलमध्ये सवाद्य मिरवणुकीबरोबरच पुस्तक वाटपकंत्राटी कामगारांच्या हक्कांसाठी विजयनगरममध्ये मोटारसायकल रॅली जरगनगर विद्यामंदिरात अधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत, अरुंधती महाडिकांच्या हस्ते शालेय साहित्य वाटपकेंद्र शाळा पाचगावमध्ये विद्यार्थ्यांची वाजतगाजत मिरवणूकविद्या मंदिर शेळप शाळेत  जिल्हाधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवादप्रत्येक पालकाने आपल्या  विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत – आयुक्त के.  मंजूलक्ष्मी.केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घेतली डॉ डी. वाय. पाटील यांची भेटप्रार्थनेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम- डॉ. विश्वनाथ एन. मगदूमहद्दवाढीच्या विरोधात मंगळवारी वीस गावांत बंद

जाहिरात

 

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घेतली डॉ डी. वाय. पाटील यांची भेट

schedule16 Jun 25 person by visibility 27 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांची भेट घेतली. डॉ. पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करून आठवले यांनी शैक्षणिकसह विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली. मंत्री आठवले सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. सकाळी पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर  आठवले यांनी कसबा बावडा येथे यशवंत निवासस्थानी जाऊन  पाटील यांची भेट घेतली. डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन आठवले यांचे स्वागत केले. यावेळी श्री राम सोसायटीचे चेअरमन संतोष पाटील, माजी नगरसेवक मोहन सालपे, सुभाष बुचडे, श्रीराम सोसायटीचे माजी चेअरमन राजीव चव्हाण, महादेव लांडगे, मिलिंद पाटील, राजीव चव्हाण,सागर यवलुजे यांनी पुष्पगुच्छ देऊन रामदास आठवले यांचे स्वागत केले. यावेळी आरपीआय आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे, प्रा.  शहाजी कांबळे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes