Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय बास्केटबॉलसह पाच राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनाचा कोल्हापूर जिल्ह्याला मानवाशीचे सामाजिक कार्यकर्ते सरदार रानगेंचा भाजपात प्रवेशडीवाय पाटील मेडिकल कॉलेजच्या एमबीबीएस प्रवेश क्षमतेत ५० जागांची वाढआषाढी वारीत कुलगुरू, प्रकुलगुरू ! शिवाजी विद्यापीठातर्फे स्वच्छतेतून सेवाभाव ! !कोल्हापुरात शुक्रवारी आयटी निर्यात शिखर परिषद, दिल्लीचे डॉ. अभय सिन्हा प्रमुख मार्गदर्शकराज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे कार्य उल्लेखनीय - जिल्हाधिकारी संतोष पाटीलवारी आनंदाची ! कोल्हापूर जिल्हा परिषदेची हमी शुद्ध पाणी पुरवठ्याची !!अमर रहे अमर रहे - लाटकर काका अमर रहे ! राष्ट्र सेवादलाकडून मानवंदना, शोकाकूल वातावरणात भरत लाटकरांना अखेरचा निरोप  कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटीचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन ! तर सेवाज्येष्ठ शिक्षक पदोन्नतीस पात्र !! राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष भरत लाटकर यांचे निधन

जाहिरात

 

उपकुलसचिव निवास माने यांना पीएचडी

schedule14 Jul 26 person by visibility 89 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन  प्रतिनिधी: शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. निवास यशोदा संभाजी माने यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. पदवी जाहीर झाली आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत व्यवस्थापन शास्त्र विषयांतर्गत ‘उच्च शिक्षण संस्थांमधील संगणकीकरण आणि ईआरपी प्रणालींची प्रभावी अंमलबजावणी’ या विषयावर डॉ. चिंतामणी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विद्यापीठास शोधप्रबंध सादर केला.
निवास माने हे प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून सर्वपरिचित आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या संगणकीकरण प्रक्रियेत उल्लेखनीय योगदान दिले आहे. प्रशासन व परीक्षा विभागातील अनेक संगणक प्रणालींच्या विकासामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून, ओपीडीसी , शिव दीक्षांत  आणि एसआरपीडी यासारख्या प्रणालींच्या निर्मिती व अंमलबजावणीत त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. या प्रणालींमुळे विद्यापीठातील कामकाज अधिक गतिमान झाले असून वेळ, श्रम आणि निधी यांची मोठी बचत झाली आहे.
त्यांना संशोधन कार्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. केदार मारूलकर तसेच परीक्षा संचालक डॉ. अजित जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes