Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
निकालानंतर कागलात वादाचे फटाके, मंडलिक-मुश्रीफ आमनेसामने !कोल्हापूरच्या चित्रकारांच्या कलाकृतीचे मुंबईत प्रदर्शनतुटलेली दोरी पुन्हा बांधता येते, मुश्रीफ यांच्या विधानावर सतेज पाटलांचे मिश्किल उत्तर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभारांच्या पुण्यतिथीनिमित्त संविधान दौड, १२०० स्पर्धकांचा सहभाग राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे 67 जणांनी मागितली उमेदवारी, 39 इच्छुकांच्या मुलाखती मुरगूडमध्ये मंडलिकच, कागल मुश्रीफ-समरजितचे, पन्हाळयाचा गड कोरेंचा, जयसिंगपुरात यड्रावकरच ! गडहिंग्लजमध्ये कोरे पराभूत, शिरोळमध्ये अशोक मानेंना झटका ! !शिवसेनेकडे उमेदवारांची तगडी फौज ! राष्ट्रवादीतही वाजतगाजत मुलाखती ! !भाषणबाजीत हरवला सिनेटमधील प्रश्नोत्तराचा तास ! मूळ विषयापेक्षा अवांतर चर्चा जास्त ! !सिनेट सदस्यांची विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शनेमहायुतीचा फॉर्म्युला ठरला ? २९ डिंसेबरपर्यंत उमेदवारांची घोषणा !

जाहिरात

 

देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभारांच्या पुण्यतिथीनिमित्त संविधान दौड, १२०० स्पर्धकांचा सहभाग

schedule21 Dec 25 person by visibility 92 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : थोर स्वातंत्र्यसेनानी, आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे, कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त कौन्सिल ऑफ एज्युकेशन, कोल्हापूर आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संविधान दौड’ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संविधाननिष्ठा, लोकशाही मूल्यांची जपणूक, पर्यावरण संवर्धन व आरोग्याविषयक जनजागृती हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू होता. या संविधान दौडीत विविध वयोगटांतील एकूण १२०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाची सुरुवात देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर संस्थेचे गीत व प्रार्थना सादर झाली. याप्रसंगी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधानिक मूल्यांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. पुढे कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या वतीने पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा घेण्यात आली. आरोग्यविषयक जनजागृतीसाठी मगदूम इंडॉस्कोपी सेंटरतर्फे आपत्कालीन प्रसंगी कशी मदत करावी याबाबत उपस्थितांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. तसेच डॉ. चंद्रकांत पाटील व मगदूम हॉस्पिटल यांच्या सहकार्याने अँब्युलन्स सेवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. जागतिक ध्यान दिनाचे औचित्य साधून मनीषा शिंदे व त्यांच्या टीमने योग प्रात्यक्षिके सादर केली.

यानंतर हलगी व झांजांच्या गजरात संविधान दौडीस प्रारंभ झाला. दौडीत ५ किलोमीटर व ३ किलोमीटर अशा दोन अंतरांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. विविध वयोगटांतील पुरुष व महिला स्पर्धकांनी मोठ्या उत्साहात या दौडीत सहभाग घेतला. प्रत्येक गटातून प्रथम पाच क्रमांक जाहीर करण्यात आले असून एकूण ५० विजेत्यांचा गौरव करण्यात आला. दरम्यान या संविधान दौडीचे उद्घाटन कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनी मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, ॲड. वैभव पेडणेकर, ॲड. अमित बाडकर, शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरू डॉ. ज्योती जाधव, प्रा. डॉ. शरद बनसोडे, ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष एस.व्ही. सूर्यवंशी व शिवछत्रपती पुरस्कार विजेते आर. व्ही. शेटगे तसेच शिवाजी विद्यापीठातील विविध पदाधिकारी व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभास शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळोखे, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन उपप्राचार्य डॉ. एस. जे. फराकटे, प्रकुल पाटील-मांगोरे, डी. आर. के. कॉलेज, शहाजी लॉ कॉलेज, नाइट कॉलेज व नर्सिंग कॉलेज यांच्या सहकार्याने करण्यात आले. अश्विनी मगदूम व डॉ. राजकिरण बिरजे यांनी सूत्रसंचालन केले.
  या स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन ने उचलली. पंचप्रमुख म्हणून अमोल आळवेकर यांनी काम पाहिले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रा. रामा पाटील, अश्विनी पाटील- मांगोरे, धीरज पाटील, विक्रम शेलार, स्वप्नील येवले, महेश मांगले, आकाश खोत, प्रदीप कांबळे, सौरभ बावडेकर, सचिन कोरवी, प्रवीण वरुटे,  दिग्विजय बुगडे, प्रशांत पाटील, रोहन माने,तुषार शिंदे, प्रथमेश झुटाळ, हेमंत पाटील

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes