Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डॉ. संजय डी. पाटील यांचा द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्डने सन्मानसंजय भोसले, दिवाकर कारंडे पुन्हा महापालिकेत कामावर रुजूवाढदिवसाला अनोखा उपक्रम, बालकल्याण संकुलातील मुलांसाठी खास शोजिल्हा परिषदेतर्फे दर शुक्रवारी सायकल डे, पदाधिकारीही करणार बसने प्रवाससामान्य माणसांनी प्रवास - खर्च कमी करायचा, भाजपचे मंत्री - नेते काय त्याग करणार ? काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सवालशुक्रवारपासून तीन दिवसीय परिस सेंद्रिय खत महोत्सव मोटेवाडी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत, जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकार करणारजनगणना कामात सहभागी शिक्षकांना बदली  रजा मंजूर करावीई चलन दंड माफीचा सरकारला विसर, कोल्हापुरात प्रदीप राठोंडाचे आमरण उपोषणमहापालिकेच्या मालकीची २१ कोटीची जागा विनावापर पडून ! विजय जाधवांनी वेधले आयुक्तांचे लक्ष!!

जाहिरात

 

वाढदिवसाला अनोखा उपक्रम, बालकल्याण संकुलातील मुलांसाठी खास शो

schedule13 May 26 person by visibility 106 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वाढदिवसाचा समारंभ हा तसा वैयक्तिक आणि कौटुंबीक स्तरावरील. वाढदिवस साजरा करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. दरम्यान सामाजिक भान ठेवत अनोख्या उपक्रमांनी वाढदिवस साजरा होत आहे. शिवाजी विद्यापीठ आजी - माजी विद्यार्थी कृती समितीचे डॉ. प्रवीण कोडोलीकर यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून १४ मे २०२६ रोजी एका खास शोचे आयोजन केले आहे. प्रयोदी सोशल अँड कल्चरल फाऊंडेशन, वाढदिवस समिती व संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान विचारे माळ मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बालकल्याण संकुलमधील मुले व वीटभट्टी कामगारांच्या मुलांना ‘राजा शिवाजी’हा सिनेमा दाखविण्यात येणार आहे. सकाळी १०.३० वाजता पीव्हीआर, डीवायपी येथे हा शो होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम, तेजस्वी इतिहास या मुलांना पाहता यावा या उद्देशाने या खास शोचे आयोजन केले आहे असे डॉ. प्रवीण कोडोलीकर यांनी सांगितले. बालकल्याण संकुलमधील मुले व वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी ही वेगळी पर्वणी ठरणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes